आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shocking: Indian Fans Came In Support Of Pakistani Skipper Sarfaraz Ahmed

इंग्रजी न येणाऱ्या PAK कर्णधाराची उडवली जातेय खिल्ली, सपोर्ट करताहेत भारतीय फॅन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - एकमेकांवर टीका करताना भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहते नेहमी दिसून येतात. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान एक मजेदार किस्सा समोर आला जेव्हा चक्क भारतीय चाहत्यांनी पाक कर्णधाराला पाठिंबा दिला. झाले असे की, सर्फराज अहमद (पाकचा कर्णधार) एका पत्रकार परिषदेत इंग्रजी बोलताना गोंधळला. त्याला इंग्रजी बोलता येत नसल्याने त्याची मोठी गोची झाली. पत्रकारांसमोर त्याचे चांगलेच हसे झाले होते. या घटनेचा व्हिडिओही व्हायरला झाला होता.
 
...आणि भारतीय चाहत्यांनी पाठिंबा दिला
-श्रीलंकेला हरवून सर्फराजने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात सर्व स्थानापन्न होत असताना सर्फराजने प्रश्न केला की "सर्वच इंग्लिशवाले आहेत काय?" सर्फराजला माहिती नव्हते की कॅमरा आणि माइक सुरू आहे आणि त्याचे बोलणे रेकॉर्ड झाले आहे.
- हा व्हिडिओ व्हायरल होताच इंडियन फॅन पेजने त्याच्या इंग्रजीवरून टिंगल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मजेदार गोष्ट अशी की, भारतीय चाहत्यांनी सर्फराजची टिंगल करण्याऐवजी त्याला पाठिंबाच दिला.
- नीरज नावाच्या एक भारतीय क्रिकेट चाहत्याने लिहिले की, मी त्याची खिल्ली नाही उडवणार. सर्फराज खूप चांगली हिंदी बोलतो. जिनियस होण्यासाठी इंग्रजी भाषा येणे गरजेचे नाही. एक खेळाडू म्हणून त्याने त्याच्या देशासाठी चांगला खेळ केला.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, पाठिंबा देणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या अशाच काही कॉमेंट‌्स...
 
बातम्या आणखी आहेत...