आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमोना हालेपने घेतला ‘झिका’चा धसका, ३७ दिवस शिल्लक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातील पाचव्या क्रमांकाची महिला टेनिसपटू रोमानियाची सिमोना हालेप ब्राझीलमध्ये पसरलेल्या खतरनाक झिका व्हायरसमुळे रिओ ऑलिम्पिकमधून माघार घेऊ शकते. २०१४ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये उपविजेती हालेप सध्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये खेळत आहे. हालेप म्हणाली, ‘झिका खतरनाक व्हायरस आहे. यामुळे मी चिंतित आहे. मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. मी झिका व्हायरसमुळे रिअाे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याबाबत अनिश्चित स्थितीत आहे. मी ऐकले आहे की, झिकाचा सर्वाधिक प्रभाव गर्भवती महिलांवर होत आहे. जर एखादी महिला गर्भवती नाही आणि तिला या व्हायरसचे संक्रमण झाले तर ती गर्भवती झाल्यानंतर तर हा व्हायरस सक्रिय होण्याची शक्यता आहे.’

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेली हालेप म्हणाली, ‘रिओमध्ये सहभागी होण्याची माझी योजना आहे. मात्र, मी तेथे गेलेले सुरक्षित असेल की नाही, यावर विचार करीत आहे. मी टेनिस खेळते, तेव्हा आरोग्य हे माझ्यासाठी सर्वप्रथम असते.’ या व्हायरसमुळे सध्या स्पर्धेवर भीतीचे सावट निर्माण झाले अाहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

हा व्हायरस महिलांसाठी सर्वाधिक खतरनाक आहे. मी विम्बल्डननंतर यावर निर्णय घेईन. मी आॅलिम्पिक खेळण्याचा निर्णय घेतला तर तो सर्वाधिक निराशाजनक असेल, असेही हालेप म्हणाली.
बातम्या आणखी आहेत...