आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिथकडे ऑस्ट्रेलियाच्या वनडे, टी-२० संघाचे नेतृत्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अॅशेस मालिकेनंतर इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्टीव्हन स्मिथकडे ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पाच वेळेसचा वर्ल्ड चॅॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघात अष्टपैलू मार्कस स्टोईनिस, फलंदाज जो. बर्न्स आणि फिरकीपटू अॅश्टन एगर यांचा इंग्लंडमध्ये होणाऱ्या वनडेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
निवड समितीचे सदस्य रोड मार्श म्हणाले, "इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी आम्ही नव्या चेहऱ्यांचा युवा संघ निवडला आहे. संघ संतुलित असून चांगले निकाल मिळतील, याची आम्हाला खात्री आहे. मार्कसची निवड त्याची चांगली कामगिरी बघून झाली. जेम्स फॉकनरच्या अनुपस्थितीत तो उपयोगी ठरेल.' ब्रेड हॅडिनच्या अनुपस्थितीत मॅथ्यू वेड यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळेल, असे त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन संघ २७ ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्ध एकमेव वनडे खेळेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध एक टी-२० आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळेल.

ऑस्ट्रेलियाचा वनडे, टी-२० संघ असा
स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अॅश्टन एगर, जॉर्ज बेली, जो. बर्न्स, नॅथन कुल्टर नील, पॅट्रिक कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, जेम्स पॅटिंसन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मॅथ्यू वेड, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, कॅमरून बाॅयस.