आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिथच्या विकेटसाठी चॅनल 9 जबाबदार? इंटरव्ह्यू देताना स्मिथ बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड- ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्हन स्मिथने भारताविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात केवळ 21 धावा काढल्या. मैदानात मायक्रोफोनच्या वापराबाबत गरज नसलेल्या वादाला त्याने जन्म घातला आहे. ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्र "सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड'ने चांगलेच ताशेरे ओढले.
आपला राग व्यक्त करताना या वर्तमानपत्राने असा वादग्रस्त मथळा दिला, भारताविरुद्ध स्टीव्ह स्मिथ बाद, पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पराभवास "चॅनल 9 जबाबदार'! ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनीही स्मिथवर टीका करताना तो इंटरव्यू देत असल्यामुळे बाद झाल्याचे म्हटले आहे.

अॅडिलेड ओव्हलवर पहिल्या टी-20 सामन्यात स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा डाव कोसळला. कांगारूंनी हा सामना 37 धावांनी गमावला. भारताने मंगळवारी पहिल्या टी-20 सामन्यात कोहलीच्या नाबाद 90 धावांच्या बळावर 20 षटकांत 3 बाद 188 धावा काढल्या. मात्र, स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव 151 धावांत आटोपला.

असा झाला स्मिथ बाद
डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीस आला. तो फलंदाजी करत असताना मायक्रोफोनचा उपयोग करून समालोचकांसोबत बोलतही होता. चॅनल-9 चे समालाेचक मार्क निकोलास, इयान हिली आणि मायकेल हसी यांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याच्या काही वेळेनंतर स्मिथने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विराट कोहलीच्या हाती मिड ऑफवर सोपा झेल दिला. झेल पकडल्यानंतर कोहलीने स्मिथला हात आणि चेहऱ्याच्या हावभावाने "बोलत असल्याचा' इशाराही केला. कोहलीने आपल्या हाताचा उपयोग करताना स्मिथला "चॅटरबॉक्स' संबोधत त्याला पॅव्हेलियनमध्ये जाताना डिवचले होते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, चाहत्यांनी सोशल मीडियावर कशी व्यक्त केली नाराजी... का झाला स्मिथ नाराज...