आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये पुन्हा हारली विराटची RCB, सोशल मीडियात उडाली यथेच्छ खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क-  IPL-10 च्या 31st मॅचमध्ये गुजरात लायन्स टीमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला 7 विकेटने हरविले. 9 मॅचेसपैकी विराटच्या नेतृत्त्वाखालील ही टीम सहा वेळा हारली आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपत आल्या आहेत. टीमच्या खराब कामगिरीमुळे बंगळुरुच्या नाराज फॅन्सनी आपला राग सोशल मीडियात काढला. फॅन्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत विराटच्या टीमची थट्टा उडविली. एका फॅनने लिहले की, विराट कर्णधार असलेली RCB आणि बॉलिवूड फिल्म 'जानी दुश्मन' यात काहीही फरक नाही. दोन्ही ठिकाणी भरपूर स्टार्स आहेत पण तरीही फ्लॉप राहिले. असा होता मॅचचा रोमांच...
 
- मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करायला उतरलेल्या बंगळुरु टीमने 20 षटकात सर्वबाद 134 धावा केल्या. 
- उत्तरादाखल गुजरातच्या दोन विकेट केवळ 23 धावात पडल्या होत्या. यानंतरही अॅरोन फिंच आणि सुरेश रैनाने तिस-या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 92 धावा जोडत विजय सोपा केला. 
- गुजरात टीमने 13.5 षटकात 135 धावा करत मॅच जिंकली. गुजरातच्या अॅंड्र्यू टायला मॅन ऑफ द मॅच घोषित केले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बंगळुरु टीमच्या पराभवानंतर सोशल मीडियात कशी उडाली त्यांची खिल्ली...
बातम्या आणखी आहेत...