इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेला बॉलर जहीर खान भारतचा दुसरा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर आहे. नुकताच 37 वर्षांचा झालेल्या जहीरने भारतासाठी 92 टेस्ट, 200 वनडे आणि 17 टी 20 सामने खेळले आहेत. या तीनही फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 610 विकेट्स घेतल्या आहेत, तो बर्याच दिवसांपासून मैदानाच्या बाहेर होता. शांत स्वभावाचा दिसणारा जहीर खरेतर प्रचंड फन लिव्हिंग आहे.
फन लव्हिंग आहे जहीर खानः
इंटरनेटवर जहीर खानचे असे अनेक फोटोज आहेत ज्यातून स्पष्ट होते की, जहीर ऑफ फील्ड बरीच मस्ती करतो. तो कधी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहेवागसह डांस पार्टी एन्जॉय करताना, तर कधी युवराज आणि हरभजनसिंहसह बीच वर मस्ती करताना दिसतो.