आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी, पत्र लिहून आईला म्हटले, मुलाचा चेहरा नाही मिळणार पाहायला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. - Divya Marathi
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
कोलकाता- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचा खुलासा खुद्द सौरवनेच केला आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याने सांगितले की, मला एक पत्र मिळाले आहे त्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्रात म्हटले आहे की, मिदनापुर विद्यासागर यूनिवर्सिटीत होणा-या इंटर-कॉलेज क्रिकेट मीटमध्ये सौरवने सामील होऊ नये. गांगुलीने याबाबतची माहिती मिदनापुर पोलिसात दिली आहे. हे पत्र 7 जानेवारीला सौरवच्या आईच्या नावाने पाठवले आहे. या पत्रात त्याच्या आईला उद्देशून लिहले की, तुमच्या मुलाचा तुम्ही चेहराही पाहू शकणार नाही. हे पत्र जेड आलम नावाच्या व्यक्तीने लिहले आहे....
 
- न्यूज एजन्सीने मिदनापूरमधील स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, हे धमकीचे पत्र जेड आलम नावाच्या अज्ञात व्यक्तीने सौरवची आई निरूपाला लिहले आहे.
- यात क्रिकेटर सौरवला इंटर-कॉलेज क्रिकेट मीटपासून लांब राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रोग्रॅममध्ये सौरवला चीफ गेस्ट म्हणून निमंत्रित केले आहे.
- हा प्रोग्रॅम 19 जानेवारी रोजी होणार आहे.
 
काय म्हटलेय पत्रात?
 
- "आपल्या मुलाला वॉर्निंग देत आहोत की, या प्रोग्रॅममध्ये सामील होऊ नये. जर त्याने अशी हिम्मत दाखवली तर तुमच्या मुलाचा तुम्हाला चेहराही पाहायला मिळणार नाही. "
- धमकीचे पत्र मिळाल्याचे सौरवने मान्य केले आहे. त्याने एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले की, "मला सात जानेवारीला पत्र मिळाले आणि मी पोलिसांना आणि ऑर्गनायजरला याबाबतची माहिती दिली आहे."
 
गांगुलीला कार्यक्रमाला जाणार?
 
- सौरवला धमकी मिळाली असली तरी तो या कार्यक्रमाला जाईल असे बोलले जात आहे. सौरवने कार्यक्रमाला जाणार नाही अशी भूमिका घेतली नसल्याचे कळते. 
- सौरव म्हणाला, "पाहूया, मी अजून कोणताही निर्णय घेतला नाही. जर मी तेथे गेलो तर तुम्हाला माहित होईलच."
- पश्चिम मिदनापुर जिल्यातील एसपी भारती घोष यांनी सांगितले की, गांगुलीला धमकीचे पत्र मिळाल्याबाबत मला काहीही माहिती नाही.
- घोष यांनी सांगितले की, "आम्हाला याबाबत काहीही माहिती दिली गेली नाही. मात्र, पत्र पाठवून धमकी देण्याबाबतचा उद्देश काय आहे याचा तपास आम्ही करू.
बातम्या आणखी आहेत...