आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speculation Rife Over CAB Chief As Sourav Ganguly Meets Mamata Banerjee

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 'दादा'च्‍या नावाची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कॅब अधिकाऱ्यांशी झालेल्‍या चर्चेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली.

जगमोहन दालमिया यांच्या आकस्मिक निधनामुळे बंगाल क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेटला सक्षम नेतृत्त्वाची आवश्यकता आहे. 'दादा' ही जबाबादारी यशस्‍वीपणे पेलण्‍यास तयार आहे.

सौरव गांगुली आधी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्‍या संयुक्त सचिवपदी होता. अध्यक्षपदासाठी दालमियांचा मुलगा अविषेक व गांगुली या दोघांमध्ये चुरस होती. दोघांनीही ममता बॅनर्जींची भेट घेऊन चर्चा केली. त्‍यानंतर गांगुलीच्‍या नावाची घोषणा करण्‍यात आली.