स्पोर्ट्स डेस्क - भारताचा माजी कर्णघार सौरव गांगुली सध्या BCCI चा अध्यक्ष बनण्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकीही मिळाली होती. 44 वर्षांचा सौरव गांगुली क्रिकेट खेळण्यादरम्यान जेवढा प्रसिद्ध होता, तेवढीच त्याची फॅन फॉलोविंग आजही आहे. सध्या तो CAB (क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल) चा अध्यक्ष आहे. प्रिन्स ऑफ कोलकाता नावाने प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीचे असे काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत, जे फोटो कदाचित त्याच्या फॅन्सनी यापूर्वी पाहिलेले नसतील.
असे राहिले करियर..
- भारतासाठी 113 टेस्ट खेळणाऱ्या गांगुलीच्या नावावर 16 शतके, 35 अर्धशतके यांच्यासह 7212 रन्स आहेत. त्याचा बेस्ट स्कोर 239 होता.
- 311 वनडेमध्ये त्याने 22 शतके आणि 72 अर्धशतके केली आहेत. 11363 धावा करताना त्याचा बेस्ट स्कोर 183 आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सौरव गांगुलीचे असेच काही खास PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)