आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sourav Ganguly To Be BCCI Adviser Soon Says Jagmohan Dalmiya

गांगुली कोच होण्याच्या चर्चांना पूर्णविराम, बीसीसीआय सल्लागार होणार दादा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बीसीसीआय प्रमुख जगमोहन दालमिया यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला लवकरच बोर्डचा अॅडव्हायजर अर्थात सल्लागार म्हणून नेमणार असल्याचे म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दालमियांनी हा खुलासा केला आहे. दालमियांच्या या घोषणेने गांगुलीच्या भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दालमियांचा माजी क्रिकेटपटूंना अॅडव्हाजर बनविण्याचा विचार आहे. जर गांगुली अॅडव्हाजर झाला तर, बीसीसीआयला टीमसाठीच्या कोचचा शोध सुरुच ठेवावा लागेल. सूत्रांच्या माहितीनूसार, गांगुलीसह सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री यांनादेखील अॅडव्हायजर केले जाण्याची शक्यता आहे. हे तिघे बीसीसीआयला क्रिकेट संदर्भात सल्ला देतील. बीसीसीआयची इच्छा आहे, की नव्या कोचच्या नियुक्तीबाबतही या तिघांनी सल्ला द्यावा.
दालमिया म्हणाले, 'क्रिकेटशी संबंधीत मुद्दे क्रिकेटरच्याच हातात असले पाहिजे, ही माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. त्या समस्या त्यांनाच अधिक चांगल्या समजू शकतात.' दालमिया लवकरच बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांची कोलकात्यात भेट घेणार आहेत, आणि त्यानंरत सल्लागारांच्या नियुक्तीची घोषणा करतील.