आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sourav Ganguly Will Be New Coach Of Bengal Cricket Team

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली लवकरच होऊ शकतो कोच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकता- टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) च्या सल्लागार समितिचा सदस्य सौरव गांगुली लवकरच कोचच्या भूमिकेत दिसूशकतो. त्याला बंगाल क्रिकेट टीमचा नवीन कोच म्हणून नियुक्त केले जाऊशकते.
गांगुलीने स्विकारला प्रस्ताव
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगाल क्रिकेट टीम (सीएबी) गांगुलीला बंगाल क्रिकेट टीमचा कोच बनवण्यासाठी उत्सूक आहे. गांगुलीने हा प्रस्तावदेखील स्विकारला आहे. अशोक मल्होत्रा हे सध्या बंगाल टीमचे कोच आहेत. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. गांगुलीही आधी बंगाल क्रिकेट टीमसाठी खेळलेला आहे.
बीसीसीआयकडून घ्यावीलागेल परवाणगी
बंगाल क्रिकेट टीमचा नवीन कोच होण्या आधी गांगुलीला बीसीसीआयची परवाणगी घ्यावी लागेल. जर बीसीसीआयने आक्षेप घेतला नाही तर, गांगुली युवा टीमला कोचिंग देईल. ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला गांगुली टीम इंडियाच्या नवीन कोचच्या रेसमध्ये देखील आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दादाच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षण...