आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa Beat England By 7 Wickets To Keep Series Alive

डी. कॉक, आमलाच्या शतकाने आफ्रिका विजयी, मालिकेतील आव्हान कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिटोरिया - सलामीवीर हाशिम आमलाचे कारकीर्दीतील २२ वे आणि सामनावीर क्विंटन डी. कॉकच्या दहाव्या शतकाच्या बळावर द. आफ्रिकेने इंग्लंडला तिसऱ्या वनडेत ७ विकेटने हरवले. या विजयामुळे द. आफ्रिकेने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. आमला-डी. कॉकने पहिल्या विकेटसाठी २३९ धावांची भागीदारी केली. या पराभवानंतरही इंग्लंड मालिकेत २-१ ने पुढे आहे.
डी. कॉकने ११७ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार आणि ४ षटकार मारले. आमलाने १३० चेंडूंचा सामना करताना १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२७ धावांची खेळी केली. विजयाची औपचारिकता फॉप डुप्लेसिसने केली. त्याने २९ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार, १ षटकारासह नाबाद ३३ धावा काढल्या.

तत्पूर्वी, इंग्लंडने जो. रुटच्या (१२५) शतकाच्या बळावर ५० षटकांत ८ बाद ३१८ धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. रुटने ११३ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ५ षटकार मारले. अॅलेक्स हेल्सने ६५ धावा, तर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ५३ धावांचे योगदान दिले.