आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa Cricket Team's Fast Bowler Dale Steyn In Funny Moments In Rajkot

जेव्हा डेल स्टेनने सहकार्‍यालाच मारायला उचलली चेअर, हॉटेलमध्येच घेतला गरब्याचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी-20 टीमचा कर्णधार फॉफ डु प्लेसिस (इनसेटमध्ये चेयर घऊन साहकार्‍यांकडे धावताना डेल स्टेन). - Divya Marathi
टी-20 टीमचा कर्णधार फॉफ डु प्लेसिस (इनसेटमध्ये चेयर घऊन साहकार्‍यांकडे धावताना डेल स्टेन).
राजकोट- दक्षिण आफ्रिकेचा संघ राजकोट येथे पोहोचला असून रविवारी होण्यार्‍या मॅचसाठी जोरदार तयारी करत आहे. यातून मिळालेल्या वेळेत ते जबरदस्त मस्तीदेखील करत आहेत. विशेषतः बिंधास्त नेचरसाठी ओळखला जाणारा डेल स्टेन भरपूर मस्ती करताना दिसून आला. याचदरम्यान शुक्रवारी संध्याकाळी काही सहकारी खेळाडूंनी जेव्हा त्याला छेडले, तेव्हा तो एकदमच भडकला. त्यने जवळ असलेली चेअर घेऊन सहक्र्‍यांना मारण्यासाठी उगारली देखील मात्र मारली नाही. कारण हा त्याचा गंभीर होण्याचा केवळ देखावाच होता. तो खरोखर चिडला नव्हता.
हॉटेलमध्येच केले होते गरब्याचे आयोजन
दक्षिण आफ्रिकी खेळाडुंसाठी हॉटेलमध्येच गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. जेथे टी-20 संघाचा कर्णधार फॉफ डु प्लेसिस, एबी डिव्हिलियर्ससह दक्षिण आफ्रिकन खेळाडुंनी गरब्याचा आनंद घेतला.

इमरान ताहिरने मशिदीत केले नमाज पठन
4 स्टार हॉटेलमध्ये थांबलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाची दिनचर्या शुक्रवार सकाळी नॉर्मलच होती. इमरान ताहिरने मशिदीत नमाज पठन करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा हॉटलमधील एका कर्मचार्‍याने त्याला जवळच्याच एका मशिदीत नेले. इमरान ताहिर शिवाय फरहान बेहरदीन, हाशिम अमला, पाकिस्ताचे अंपायर अलीम दार यांच्यासह 9 जन कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नमाजसाठी गेले. मशिदीत इमरानने काही फोटोही काढले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...