आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • SPO FTF India Vs Pakistan Final Match In Champion Trophy LIVE Full Scoreboard

टीम इंडियाचा 180 धावांनी पराभव; पाकला विजेतेपद, पराभवातही इंडियाने केला विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताविरुद्ध शतक ठोकल्यानंतर आनंदीत झालेला पाकचा फखर जमान. - Divya Marathi
भारताविरुद्ध शतक ठोकल्यानंतर आनंदीत झालेला पाकचा फखर जमान.
लंडन - फखर जमानच्या (११४) दमदार शतकानंतर माेहम्मद आमेर (१६ धावांत ३ विकेट) आणि हसन अलीच्या (१९ धावांत ३ विकेट) धारदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला १८० धावांच्या विशाल अंतराने हरवले. पाकिस्तानने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. दुसरीकडे टीम इंडिया दुसऱ्यांदा उपविजेता बनली. २००२ मध्ये संयुक्त विजेता, २०१३ मध्ये चॅम्पियन असलेली टीम इंडिया २००० मध्ये केनियात झालेल्या स्पर्धेत उपविजेता होती. त्या वेळी न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताला हरवले होते.
 
१८० धावांनी पराभव हा आयसीसीच्या स्पर्धेतील फायनलमध्ये धावांच्या अंतराने सर्वांंत मोठा पराभव ठरला आहे. मागचा विक्रम (१२५ धावांनी) भारताच्या नावे होता. २००३ च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाने या अंतराने हरवले होते. वनडेत धावांच्या अंतराने पाकिस्तानचा हा भारतावर सर्वांत मोठा विजय आहे. मागचा विक्रम १५९ धावांनी होता. त्या वेळी पाकने २००५ मध्ये दिल्लीत विजय मिळवला होता.
 
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना पाकने सलामीवीर फखर जमानच्या (११४) करिअरच्या पहिल्या शतकाच्या बळावर ४ बाद ३३८ धावांचा डोंगर उभा केला. हा या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोअर ठरला. शिवाय वनडेत प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाविरुद्ध हा पाकचा सर्वांत मोठा स्कोअर होता. प्रत्युत्तरात टीम इंडिया दबावात ३०.३ षटकांत १५८ धावांत ढेर झाली. हार्दिक पंड्याने सर्वाधिक ७६ धावा काढल्या. मो. आमेरने पहिल्याच स्पेलमध्ये टीम इंडियाचे फॉर्मात असलेले फलंदाज रोहित शर्मा (०), विराट कोहली (५) आणि शिखर धवन (२१) यांना बाद केले. युवराजसिंग (२२), धोनी (४), केदार जाधव (९)  सुद्धा अपयशी ठरले. पंड्याने चांगला खेळ केला, मात्र जडेजामुळे तो धावबाद झाला.
 
तत्पूर्वी, पाककडून फखरने अझहर अलीसोबत (५९) पहिल्या विकेटसाठी २३ षटकांत १२८ धावांची सलामी देऊन शानदार सुरुवात केली. यानंतर त्याने बाबर आझमसोबत (४६) दुसऱ्या विकेटसाठी १०.१ षटकांत ७२ धावांची भागीदारी करून पाकला मजबूत स्थितीत पोहोचवले. फखरचा जोडीदार अझहर अलीने ७१ चेंडूंत १ षटकार, ६ चौकारांसह ५९ धावा काढल्या.  बाबर आझमने ५२ चेंडूंत ४ चौकारांसह ४६ धावांचे योगदान दिले. माजी कर्णधार मोहम्मद हफिजने ३७ चेंडूंत नाबाद ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ४ चौकार मारले. इमान वसीमने २१ चेंडूंत १ षटकार, १ चौकारासह नाबाद २५ धावा काढल्या.
 
पराभवातही टीम इंडियाने केला विक्रम
१८० धावांनी पराभव हा आयसीसीच्या स्पर्धेतील फायनलमध्ये धावांच्या अंतराने सर्वांंत मोठा पराभव ठरला आहे. मागचा विक्रम (१२५ धावांनी) भारताच्या नावे होता. २००३ च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाने या अंतराने हरवले होते. वनडेत धावांच्या अंतराने पाकिस्तानचा हा भारतावर सर्वांत मोठा विजय आहे. मागचा विक्रम १५९ धावांनी होता. त्या वेळी पाकने २००५ मध्ये दिल्लीत विजय मिळवला होता.
बातम्या आणखी आहेत...