Home »Sports »From The Field» Ipl 2017 Lions Vs Royal Challengers At Rajkot News

गेल, काेहलीच्या ‘विराट’ खेळीने बंगळुरूचा विजय; गुजरात टीमचा चाैथा पराभव

दिव्‍य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 03:37 AM IST

राजकाेट - स्फाेटक फलंदाज क्रिस गेल (७७) अाणि काेहली (६४) यांच्या विराट खेळीच्या बळावर राॅयल चॅलेजर्स बंगळुरू संघाने मंगळवारी दहाव्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला.
सलगच्या पराभवाची मालिका खंडीत करून बंगळुरूने लीगमधील अापल्या सहाव्या सामन्यात यजमान गुजरात लायन्सचा २१ धावांनी पराभव केला.यजुवेंद्र चहलने(३/३१) धारदार गाेलंदाजी करताना बंगळुरू टीमला विजय मिळवून दिला. बंगळुरू टीमचा स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला. सुरेश रैनाच्या यजमान गुजरात लायन्सला चाैथ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.
प्रथम फलंदाजी करताना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित २० षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात २१३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात गुजरात लायन्सला घरच्या मैदानावर ७ गडी गमावून १९२ धावांपर्यंत मजल मारता अाली. गुजरातकडून मॅक्लुमने (७२) केलेली एकाकी खेळी व्यर्थ ठरली.
खडतर अाव्हानाला सामाेरे जाणाऱ्या गुजरातची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर स्मिथ (१) अाल्यापावली तंबूत परतला. त्यानंतर सुरेश रैनाने २३ धावांची खेळी करून तंबू गाठला. दरम्यान, मॅक्लुमने अॅराेन फिंचसाेबत डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. मॅक्लुमने ४४ चेंडूंत २ चाैकार अाणि ७ षटकारांच्या अाधारे ७२ धावा काढल्या.
चहलचे तीन बळी :बंगळुरूकडून यजुवेंद्र चहलने धारदार गाेलंदाजी केली. त्याने ४ षटकांत ३१ धावा देताना ३ बळी घेतले. नेगी, अरविंद, मिलानेने प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, बंगळूरूला क्रिस गेल (७७) अाणि विराट काेहलीने (६४) १२२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यांच्यामुळे बंगळुरूला दमदार सुरुवात करता अाली. गेलने ३८ चेंडूंत ५ चाैकार अाणि ७ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली.

काेहलीचा झंझावात :कर्णधार काेहलीने झंझावाती फलंदाजी केली.त्याने ५० चेंडूंत ७ चाैकार अाणि एका षटकारासह ६४ धावांची खेळी केली.

धावफलक
रॉयल चँलेजर्स बंगळुरू धावा चेंडू ४ ६
गेल पायचित गो. थंम्पी ७७ ३८ ०५ ७
कोहली झे. स्मिथ गो. कुलकर्णी ६४ ५० ०७ १
हेड नाबाद ३० १६ ०२ १
केदार जाधव नाबाद ३८ १६ ०५ २
अवांतर : ४. एकूण : २० षटकांत २ बाद २१३ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२२, २-१५९. गोलंदाजी : धवल कुलकर्णी ४-०-३७-१, थंम्पी ४-०-३१-१, टाय ४-०-३४-०, रविंद्र जडेजा ४-०-५७-०, कौशिक ३-०-३६-०, डॅरेन स्मिथ १-०-१७-०.
गुजरात लॉयन धावा चेंडू ४ ६
डॅरेन स्मिथ झे. मनदीप गो. चहल ०१ ०४ ०० ०
मॅक्युलम झे. मिलने गो. चहल ७२ ४४ ०२ ७
रैना झे. वॉटसन गो. चहल २३ ०८ ०२ २
फिंच यष्टी. जाधव गो. नेगी १९ १५ ०२ १
कार्तिक झे. कोहली गो. अरविंद ०१ ०४ ०० ०
रविंद्र जडेजा धावबाद २३ २२ ०२ ०
किशन झे. चहल गो. मिलने ३९ १६ ०२ ४
टाय नाबाद ०६ ०६ ०० ०
थंम्पी नाबाद ०० ०१ ०० ०

अवांतर : ८. एकूण : २० षटकांत ७ बाद १९२ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१, २-३७, ३-१०३, ४-१०६, ५-१३७, ६-१६५, ७-१९१. गोलंदाजी : पवन नेगी ४-०-२१-१, यजुवेंद्र चहल ४-०-३१-३, श्रीनाथ अरविंद ४-०-५३-१, मिलने ४-०-४३-१, शेन वॉटसन २-०-२४-०, हेड २-०-१८-०. सामनावीर : क्रिस गेल.

Next Article

Recommended