नुकतेच फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने प्रोड्यूसर मधु मंतेनाबरोबर लग्न केले. मसाबा हे बॉलीवुडमधिल मोठे नाव आहे. नीना गुप्ता आणि माजी वेस्ट इंडीज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची ती मुलगी. 1980 च्या दशकात वेस्ट इंडीज संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा रिचर्ड्स यांची नीनाबरोबर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. मात्र नीनाच्या घरच्यांचा या संबंधांना विरोध होता.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असतानाच झाला मसाबाचा जन्म
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतानाच नीना प्रेग्नंट झाली. ही गोष्ट जेव्हा विवियन रिचर्ड्सला कळली तेव्हा त्याने तिची टाळा-टाळ सुरू केली, मात्र नीनाने आपत्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. 1989 मध्ये नीनाने रिचर्ड्सची मुलगी मसाबाला जन्म दिला. या काळात निनाचा हा निर्णय फार धाडसी मानला जात होता.
स्पोर्ट्स जगतात असे अनेक स्टार्स आहेत जे केवळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येच राहत नाही तर, त्यांच्या या नात्यापासून त्यांना मुले झाली आहेत. या पैकी, काहीजन लग्नाच्या बंधनात अडकले तर काही अद्यापही लिव्ह इन रिलेशनमध्येच आहे. एवढेच नाही तर काही नाती तर असे ही आहेत जे, लिव्ह-इनच्या पुढे ढळूच शकली नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्पोर्ट्स जगतातील काही अशीच नाती...