कोलकाता/कराची - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) डिसेंबरमध्ये प्रस्तावित भारत-पाकिस्तानदरम्यान मालिका बांगलादेश किंवा श्रीलंकेत आयोजित करण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने यूएईमध्ये खेळण्यास नकार दिला, तर शिवसेनेच्या धमकीमुळे पाकिस्तानने भारतात खेळण्यास नाही म्हटले. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही मालिका बांगलादेश किंवा श्रीलंकेत खेळवण्याचा पर्याय सुचवला.
मॅच फिक्सिंगच्या शंकेमुळे यूएईमध्ये खेळण्यास बीसीसीआय तयार नाही. मात्र, मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यावर दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. यामुळेच बीसीसीआय बांगलादेश आणि श्रीलंकेत मालिका आयोजित करण्याचा विचार करीत आहे.