कोलंबो - पहिली कसोटी जिंकल्यानंतर श्रीलंका टीम अत्यंत भावुक झाली आहे. संपूर्ण संघ जोरदार सराव करीत आहे. मीडियाने याचे कारण विचारले असता संगकाराच्या निवृत्तीची कसोटी कोणत्याही परिस्थतीत जिंकायची असून त्याला विजयी निरोप द्यायचा असल्याचे लंकेच्या गोटातून कळले. या विजयाने आम्हाला दुहेरी आनंद होईल, असे लंकेचा कर्णधार अँज्लो मॅथ्यूजने सांगितले. एक तर संगकारा विजयासह निवृत्त होईल, दुसरे म्हणजे भारताविरुद्ध आमचा मालिका विजय असेल.
दुसऱ्या कसोटीला २० ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या सामन्यानंतर संगकाराच्या कारकीर्दीला विराम लागेल. संगकाराच्या निरोप समारंभाला भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. संगकारासुद्धा कारकीर्दीचा समारोप करण्यास इच्छुक आहे.
भारताविरुद्ध संगकारा
कसोटी १६, धावा : १३०२, सर्वश्रेष्ठ : २१९, १००/५० : ५/६
वनडे: ७६, धावा: २७००, श्रेष्ठ: १३८*, १००/५०: ६/१८.