आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka Cricketer Dinesh Chandimal With His Wife

ही आहे, टीम इंडियाला हरवणार्‍या लंकन क्रिकेटर चंडीमलची ग्लॅमरस पत्नी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीसह श्रीलंकन क्रिकेटर दिनेश चंडीमल. - Divya Marathi
पत्नीसह श्रीलंकन क्रिकेटर दिनेश चंडीमल.
भारताविरुद्ध होणार्‍या तीन टेस्ट मॅचच्या सीरीजमधील पहिला सामनात श्रीलंकेने जिंकला. सुरुवातीचे दोन दिवस बॅकफूटवर असलेल्या श्रीलंकन संघाने जोरदार पुनरागमन करून हा सामना जिंकला होता. बॅट्समॅन दिनेश चंडीमल याला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणूही घोषित करण्यात आले होते. श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला चंडीमल सध्या चांगलाच चर्चेत आहे. क्रिकेटशिवाय श्रीलंकेच्या या हिरोच्या पर्सनल लाइफविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. चंडीमलचा विवाह होऊन साधारणपणे जेमतेम तीन महीनेच झाले आहेत.

मॅनेजमेंट स्टूडेंट आहे मिसेस चंडीमलः
दिनेश चंडीमलची पत्नी 'इसिका जयासेकरा' ही मॅनेजमेंट स्टूडेंट आहे. इसिकाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या माहिती नुसार, ती अंडर ग्रॅजुएट असून बिझनेस मॅनेजमेंट करत आहे. या कपलचा विवाह 1 मे, 2015 ला झाला. लग्नाच्या आधी दिनेश-इसिका बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते.

वेगवान अर्धशतक करणारा श्रीलंकन खेळाडूः
वर्ल्ड कप 2015 मध्ये चंडीमल हा श्रीलंकेतर्फे सर्वाधिक वेगवान 50 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळतांना 22 चेंडूत 50 धावा फटकावल्या होत्या. पण तो मॅचमध्ये रिटायर्ड हर्ट झाला होता.
टीममध्ये संगकाराची जागा भरून काढलीः
चंडीमलने त्याला विकेटकीपर-फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. त्याने टीममध्ये कुमार संगकाराची जबाबदरी यशस्वीपणे सांभाळली आहे. संगकाराने वनडे मॅच मधून रिटायरमेंट घेतली असून, या सीरीजचा दुसरा मॅच त्याच्या करिअरचा अंतीम टेस्ट मॅच असणार आहे. संगकारा श्रीलंकेचा यशस्वी किपर-बॅट्समॅन राहिला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दिनेश चंडीमलचे त्याच्या ग्लॅमरस पत्नीबरोबरचे काही फोटोज...