आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka Tour Of India, 2nd T20I: India V Sri Lanka At Ranchi, Feb 12, 2016

धोनीच्या होमग्राउंडवर टीम इंडियाचा \'जलवा\', शिखर-रोहितसह हे ठरले हीरो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - धाेनीच्या नेतृृत्वात भारतीय संघाने शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी विजयाची नाेंद केली. शिखर धवन सामनावीराचा मानकरी ठरला. मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना रविवारी रंगणार अाहे.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंकेसमाेर विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात श्रीलंकेला १२७ धावांपर्यंत मजल मारता अाली. अार. अश्विन (३/१४), अाशिष नेहरा (२/२६), रवींद्र जडेजा (२/२४) अाणि बुमराह (२/१७) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने ६९ धावांनी सामना जिकंला. श्रीलंकेकडून कपुगेदराने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. सलामीवीर गुनाथिलका (२), दिलशान (०) अाणि प्रसन्ना (१) हे झटपट बाद झाले. त्यानंतर कर्णधार चांदिमल (३१) अाणि कपुगेदराने संघाचा डाव सावरला. मात्र, त्यांनाही फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. भारताच्या धारदार गाेलंदाजीसमाेर श्रीलंकेचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

तत्पूर्वी भारताकडून राेहित शर्मा (४३) व शिखर धवन (५१) यांनी अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणे (२५), सुरेश रैना (३०), हार्दिक पंड्या (२७) यांनीही शानदार फलंदाजी करून टीम इंडियाच्या धावसंख्येला गती दिली.
धावफलक
भारत धावा चेंडू ४ ६

रोहित शर्मा झे. गो. चामिरा ४३ ३६ २ १
धवन झे. चांदिमल गो. चामिरा ५१ २५ ७ २
रहाणे झे. दिलशान गो. सेनानायके २५ २१ ३ ०
सुरेश रैना झे. चामिरा गो. परेरा ३० १८ ५ ०
पंड्या झे. गुणथिलाका गो. परेरा २७ १२ १ २
महेंद्रसिंग धोनी नाबाद ०९ ०५ ०१ ०
युवराजसिंग झे. व गो. चामिरा ०० ०१ ०० ०
रवींद्र जडेजा नाबाद ०१ ०१ ० ०
अवांतर : १०. एकूण : २० षटकांत बाद १ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-७५, २-१२२, ३-१२७, ४-१८६, ५-१८६, ६-१८६, ७-, ८-. गोलंदाजी : राजिथा ४-०-४५-०, परेरा ३-०-३३-३, सेनानायके ४-०-४०-१, चामिरा ४-०-३८-२, प्रसन्ना ३-०-२१-०, सिरिवर्धन १-०-६-०, शानका १-०-१२-०.

श्रीलंका धावा चेंडू ४ ६
गुणथिलाका झे. धोनी गो. नेहरा ०२ ०७ ० ०
दिलशान यष्टी. धोनी गो. अश्विन ०० ०१ ० ०
प्रसन्ना झे. युवराजसिंग गो. नेहरा ०१ ०४ ० ०
चांदिमल यष्टी. धोनी गो. जडेजा ३१ ३० २ ०
कपुगेदरा झे. पंड्या गो. जडेजा ३२ २७ ३ १
सिरिवर्धने नाबाद २८ २० १ १
शानका झे. रैना गो. अश्विन २७ १८ ० ३
परेरा झे. रहाणे गो. अश्विन ०० ०१ ० ०
सेनानायके पायचीत गो. बुमराह ०० ०२ ० ०
चामिरा त्रि. गो. बुमराह ०० ०३ ० ०
राजिथा नाबाद ०३ ०७ ० ०
अवांतर : ३. एकूण : २० षटकांत ९ बाद १२७ धावा. गडी बाद क्रम : १-२, २-२, ३-१६, ४-६८, ५-६८, ६-११६, ७-११७, ८-११९, ९-११९. गोलंदाजी : आर. अश्विन ४-०-१४-३, आशिष नेहरा ३-०-२६-२, युवराजसिंग ३-०-१९-०, रवींद्र जडेजा ४-०-२४-२, सुरेश रैना २-०-२२-०, बुमराह ३-०-१७-२, हार्दिक पांड्या १-०-५-०.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणते ठरले सामन्याचे टर्निग पॉइंट...
आणि सामन्याचा रोमांच...