आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासन करणार आता बीसीसीआयचे प्रतिनिधित्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवडीपासून राेखण्यात आल्यानंतरही श्रीनिवासन हे बार्बाडाेसमध्ये हाेणार्‍या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जगमाेहन दालमिया यांच्याएेवजी आयसीसी बाेर्ड मीटिंगला श्रीनिवासन यांचे नाव आल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला ताेंड फुटण्याची चिन्हे आहेत.

दुबईत २४ जूनपासून हाेणार्‍या आयसीसीच्या बैठकीस श्रीनिवासन हे आयसीसी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयसीसी बाेर्ड मीटिंगमध्ये दहा पूर्ण सदस्य आणि तीन निवडून आलेले सदस्य यांचा असताे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मार्चमध्ये निवड हाेऊनदेखील दालमिया हे बीसीसीआयचे प्रतिनिधित्व का करू शकत नाहीत, ती बाब अनुत्तरित आहे. दरम्यान, आयसीसी बाेर्ड मीटिंगपूर्वी हाेणार्‍या चीफ एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या बैठकीत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...