आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivasan Saved Dhoni From Sacking In 2012: Former Raja Venkat

...तेव्हा काेहलीकडील नेतृत्वास श्रीनिंचा विराेध! माजी अध्यक्ष राजा वेंकट यांचा गाैप्यस्फाेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - तीन वर्षांपूर्वीच युवा फलंदाज विराट काेहलीकडे भारतीय टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्याची याेजना हाेती. मात्र, काेहलीच्या कर्णधारपदावरील निवडीला प्रत्यक्षात बीसीसीअायचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विराेध केला हाेता, असा गौप्यस्फाेट निवड समितीचे माजी अध्यक्ष राजू वेंकट यांनी केला. त्यामुळेच महेंद्रसिंग धाेनीची टीमच्या कर्णधारपदावर वर्णी लागली, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

गत २०११ च्या शेवटी अाणि २०१२ च्या सुरुवातीला भारतीय संघाने अाॅस्ट्रेलियाचा दाैरा केला. या दाैऱ्यामध्ये धाेनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघामध्ये अनेक गट झाले हाेते. निवड समितीमधील अनेकांनी काेहलीकडे नेतृत्व देण्याची तयारी दर्शवली हाेती. संघामध्ये एकता निर्माण करण्यासाठी युवा खेळाडूकडे नेतृत्व साेपवण्यात यावे, यावर एकमत झाले हाेते. याचदरम्यान २०१०-११ च्या देवधर ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत विराट काेहलीने उत्तर विभागाचे प्रभावीपणे नेतृत्व करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले हाेते. मात्र, या वेळी झालेल्या चर्चेनंतर श्रीनिवासन यांनी काेहलीकडे नेतृत्व साेपवण्याला विराेध केला हाेता.