आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Star Of 1998 World Cup Blind Cricketer Bhalaji Damor Now Tends Cattle

ब्लाइंड वर्ल्डकपच्‍या बेस्ट प्लेयरवर म्‍हशी चारण्‍याची वेळ, वाचा भालाजीची कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतात म्‍हशी चारताना भालाजी डोमार. - Divya Marathi
शेतात म्‍हशी चारताना भालाजी डोमार.
ब्लाइंड क्रिकेट वर्ल्‍ड कप 1998 चे बेस्‍ट प्‍लेयर राहिलेले भालाजी डोमार हे आज अत्‍यंत गरीब परिस्‍थितीत जीवन जगत आहेत. कुटूंबाच्‍या उदरनिर्वाहासाठी म्‍हशी चारण्‍याशिवाय त्‍यांच्‍याकडे दुसरा पर्याय नाही. तत्‍कालीन राष्‍ट्रपती के. आर. नारायण यांनी त्‍यांचे कौतूकही केले होते.
ऑलराऊंडर : 3215 धावा, 150 विकेट्स
38 वर्षीय भालाजी यांच्‍ाी क्रिकेटमधील कामगिरी उल्‍लेखनिय राहिली आहे. संघाचे ते ऑलराऊंडर खेळाडू होते. 125 मॅच खेळून त्‍यांनी 3125 धावा बनवल्‍या आहेत. 150 विकेट्सची नोंदही त्‍यांच्‍या नावावर आहे. ते अजूनही ब्‍लाइंड क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक विकेट्स घेणारे बॉलर आहेत.
महिन्‍याच्‍ाी कमाई 3 हजार रूपये
भालाजी आणि त्‍यांच्‍या भ्‍ााऊ मिळून अरावली जिल्‍ह्यातील पिपराणा येथे केवळ एक एकर शेती आहे. यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही. ब्‍लाईंड असल्‍याने त्‍यांना मजूर म्‍हणूनही कोणी काम देत नाही. त्‍यांची पत्‍नी शेती करते. दोघांना चार वर्षाचा एक मुलगाही आहे. त्‍यांच्‍या कुटूंबाची एका महिन्‍याची कमाई केवळ 3 हजार रूपये आहे. जी बेस्‍ट प्‍लेयर ऑफ द वर्ल्‍ड कप- 1998 च्‍या अवार्डच्‍या 5 हजार रूपयांपेक्षाही कमी आहे.
आरक्षणाचाही फायदा नाही
भालाजी म्‍हणतो की, "वर्ल्‍ड कपनंतर मला आशा होती की, कुठेतरी नोकरी मिळेल. पण तसे झाले नाही. हॅन्‍डिकॅप खेळाडूंसाठी असलेले आरक्षणही कामी आले नाही.'
अधिकारी काय म्‍हणतात
ब्‍लाइंड पिपल्‍स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष भूषण पुनानी यांचे असे मत आहे की, हुषार आणि स्‍पेशल कॅटेगिरी असलेल्‍या खेळाडूंकडे सरकार लक्ष देत नाही.
पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा भालाजी डोमार यांचे फोटो..