आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीचा निर्णय घेतला असता तर मी धोनीच्या घरापुढे धरणे आंदोलन केले असते, माजी कर्णधार सुनील गावसकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२० संघाचे फक्त कर्णधारपद सोडले आहे..खेळणे नव्हे. त्याने जर निवृत्तीचा निर्णय घेतला असता मी धोनीच्या घरापुढे धरणे आंदोलन करून त्याला पुन्हा खेळण्यासाठी विनंती केली असती, असे भारताचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी म्हटले.
 
“त्याने खेळाडू म्हणून सुद्धा खेळणे सोडले असते तर मी गप्प  बसलो नसतो. मी त्याच्या घराबाहेर धरणे आंदोलन केले असते आणि त्याला पुन्हा खेळण्यासाठी विनंती केली असती. धोनीने कर्णधारपद सोडले आहे. मात्र, एक खेळाडू म्हणून तो आजही विध्वंसक फलंदाज आहे. तो आजही एकहाती सामन्याचे चित्र बदलू शकतो. जर माझ्या आयुष्यात शेवटचे १५ सेकंद उरले असतील तर मी त्यावेळेत धोनीने वर्ल्डकपमध्ये मारलेला शेवटचा षटकार पाहील आणि समाधानाने शेवटचा श्वास घेईन,’ असे गावसकर यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...