आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या 4 महिन्यांपासून भारतात आहे स्टीव स्मिथ, असा रोमांचक राहिला त्याचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंक्य रहाणेसमवेत पुणेरी पगडी घातलेला स्मिथ (डावीकडे) आणि इंडियन रेस्टांरंट फूडची मजा घेताना स्मिथ (उजवीकडे)... - Divya Marathi
अजिंक्य रहाणेसमवेत पुणेरी पगडी घातलेला स्मिथ (डावीकडे) आणि इंडियन रेस्टांरंट फूडची मजा घेताना स्मिथ (उजवीकडे)...
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियन टीम आणि आयपीएलमधील पुणे टीमचा कर्णधार स्टीव स्मिथने भारतात सलग 4 महिने घालवले. या वर्षी 23 फेब्रुवारीपासून 25 मार्चपर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या 4 कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी तो भारतात आला होता तेव्हापासून तो भारतातच आहे. कारण या मालिकेनंतर लागलीच आयपीएलची हंगाम सुरु झाला होता. ही आयपीएल स्पर्धा 47 दिवस चालली व यादरम्यान स्मिथने पुणे संघाचे कर्णधारपद भूषवले. स्मिथने भारतात घालवलेल्या या 4 महिन्यांबाबत सोशल मीडियात आपला अनुभव शेयर केला आहे. मागील 4 महिने जीवनातील महत्त्वाचे क्षण...
 
- स्मिथने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो कोलाज शेयर करत लिहले की, भारतात मागील 4 महिन्यांपासूनचा प्रवास जबरदस्त राहिला.
- या दरम्यान अनेक चढ-उतार आले, ज्यातून मला खूप काही शिकता आले. भारताविरूद्धची कसोटी मालिका कठिण होती पण या दौ-यात खूप मजा आली, तसेच खूप शिकायला मिळाले.
- पुढे स्मिथ लिहतो की, या दरम्यान माझी अनेक खास लोकांशी भेटी झाल्या. मला नवनविन मित्र मिळाले. 
- आयपीएलमध्ये पुण्यासोबतच खेळण्याचा अनुभव खूपच खास आणि मजेशीर राहिला. 
- मी भारत देशाला आणि येथील प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद देऊ इच्छितो की, तुमच्यामुळे माझा मागील 4 महिन्यांचा प्रवाास माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा व आठवणीतील कोलाज बनला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, Photos मध्ये स्टीव्ह स्मिथची भारतातील कशी होती सफर...
बातम्या आणखी आहेत...