आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड विरूद्ध वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, स्मिथ करेल.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अॅशेस सीरीजनंतर आता इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्याची धुरा स्टीव्हन स्मिथकडे असेल. पाच वेळचा वर्ल्डकप चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या टीममध्ये ऑलराउंडर मार्कस स्टॉयनिस, बॅट्स जो बर्न्स आणि स्पिनर अॅश्टन अगर हे इंग्लंडमध्ये होणाऱ्या या सीरीजपासून वनडे डेब्यू करतील. युवा खेळाडूंनी भरलेल्या या 15 सदस्यीय टीमचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेला स्मिथ, हा मायकल क्लार्कने निवृत्ती घेतल्यानंतर सर्वप्रकारच्या क्रिकेट साठी कर्णधार होऊशकतो.
टीममध्ये आहे योग्य संतुलनः
टीमचे मुख्य निवडकरता रॉड मार्श यांनी म्हटले आहे, “इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसीठी आम्ही नवीन चेहऱ्यांची निवड करून युवा टीम तयार केली आहे. या टीममध्ये योग्य संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला असून, चांगला परिणाम दिसून येईल. मार्कसची निवड त्याचे चांगले प्रदर्शन पाहून केली आहे. तो जेम्स फॉकनरच्या अनुपस्थितीत टीमसाठी उपयोगी ठरेल. या बरोबरच ब्रॅड हॅडिन नसल्याने त्याच्या जागी मॅथ्यू वेड विकेटच्या मागे जबाबदारी संभाळेल.”
ऑस्ट्रेलिया 27 ऑगस्टला आयर्लंडविरूद्ध एक वनडे सामना खेळेल. यानंतर इंग्लंडविरूद्ध एक टी-20 आणि पाच वनडे सामन्यांची सीरीज खेळेल.
वनडेसाठी असा असेल ऑस्ट्रेलियन संघः
स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अॅश्टन अगर, जॉर्ज बेली, जो बर्न्स, नॅथन कॉल्टर नील, पॅट्रिक कमिन्स, ग्लॅन मॅक्सवेल, मिचेल मार्श, जेम्स पॅटिन्सन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, शेन वाटसन, डेविड वॉर्नर, कॅमरून बॉयस.