आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Future Of BCCI After Death Of Dalmiya

दालमियांनी 1996 WC मध्ये BCCI ला बनवले श्रीमंत, वाचा बोर्डाचे भविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बोर्डाच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. एल श्रीनिवास फिक्सिंग प्रकरणामुळे बाहेर पडले त्यावेळी त्यांनी बीसीसीआयची जबाबदार स्विकारली होती. दालमियांच्या पुनरागमनाची चर्चा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे 1996 मध्ये स्पॉन्सरशिर आणि टिव्ही राइट्सच्या माध्यमातून त्यांनीच बीसीसीआयला मोठ्या प्रमामावर पैसा मिळवून दिला होता. आता दालमियांनंतर जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या या क्रिकेट बोर्डाची जबाबदारी कोण स्वीकारणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे बीसीसीआयची एकूण संपत्ती 2014 मध्ये 1891 कोटी होती. 2023 पर्यंत ती 4000 ते 5000 कोटींपर्यंत जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे.

दालमियांनी मिळवलेले यश...
- दालमिया आणि आयएल बिंद्रा यांच्या जोडीमुळेच 1987 चा वर्ल्डकप भारत आमि पाकिस्तानात खेळला गेला.
- दालमियांमुळेच 1996 चा वर्ल्ड कप भारत-पाकिस्तान-श्रीलंका या तीन देशांत झाला.
- केवळ 1.8 कोटी नफा असलेल्या बीसीसीआयला दालमियांनी 1996 मध्ये 80 कोटी रुपये मिळवून दिले.
- 1997 मध्ये ICC प्रेसिडेंट बनत त्यांनी आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये इंग्लंड-ऑस्टेलियाचा दबदबा संपुष्टात आणला.

WHAT NEXT : अंतरिम अध्यक्ष बनणार.. AGM मध्ये निर्णय होणार...
1. लगेच अध्यक्ष कोण बनणार?
दालमिया यांच्या निधनानंतर बोर्डाच्या एखाद्या वरिष्ठ सदस्याला इंटरिम किंवा अॅडहॉक प्रेसिडेंट बनवले जाऊ शकते. त्या पदासाठी राजीव शुक्ला किंवा अनुराग ठाकूर स्पर्धेत असतील.

2. पुढची प्रक्रिया काय?
अॅडहॉक प्रेसिडेंट निवडल्यानंतर या प्रकरणी स्पेशल AGM मध्ये चर्चा केली जाईल. पुढचा अध्यक्ष कसा निवडला जाईल हे या बैठकीत ठरेल.

3. पुन्हा पूर्ण निवडणुका..
याची शक्यता तशी कमीच आहे. कारण बीसीसीआयच्या ‘इलेक्शन ऑफ ऑफिस बेअरर्स अँड व्हाइस प्रेसिडेंट्स’ मधील नियम क्रमांक 15 नुसार एखाद्या अध्यक्षांचा मृत्यू झाला तर 15 दिवसांत स्पेशल जनरल बॉडी मिटींग बोलवाली. त्यात नव्या अध्यक्षाची निवड करावी. झोनच्या सर्व मेंबर्सनी त्यांना नॉमिनेट करावे. पुढच्या निवडणुकीपर्यंत हा अध्यक्ष पदावर राहू शकतो. ही प्रक्रिया अवलंबल्यास सप्टेंबर 2017 पर्यंत निवडणुका होणार नाहीत.

4. पुढच्या अध्यक्षपदासाठी स्पर्धेत कोण...
2 मार्च रोजी झालेल्या AGM मध्ये दालमियांना इस्ट झोनमधून निवडले गेले होते. त्यामुळे त्यांच्यानंतर इस्ट झोनलाच जनरल बॉडी मिटींगमध्ये अध्यक्षपदासाठी नव्या उमेदवाराचे नाव देता येईल. तसे झाल्यास ईस्ट झोनचे उपाध्यक्ष गौतम रॉय यांचे नाव सर्वात पुढे असेल. गौतम रॉय यांच्यापेक्षा वजनदार उमेदवार समोर आल्यास इस्ट झोन एक प्रपोजल पास करून त्यांचा अमेदवार न देण्याचे स्पष्ट करू शकतात.

5. पवार आणि श्रीनिवासन किंवा त्यांच्या लॉबीची भूमिका...
याबाबत मत मांडणे कठीण आहे. दालमियांच्या निवडीपासून पवार BCCI च्या सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. तर श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानेच मानई केलेली आहे. ते बीसीसीआयच्या बैठकांमध्येही येऊ शकतात की नाही, याबाबत कोर्टात खटला सुरू आहे. दोघांच्या लॉबीचा विचार करता पवारांच्या समर्थनातील झोनमधील त्यांचा व्हाइस प्रेसिडेंट निवडणुकीच्या स्पर्धेत उतरू शकतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा, दालमियांनी बीसीसीआयसाठी दिलेले योगदान...