आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Great Indian Commentrater Harsha Bhogale

IPL साठी मराठमोळे हर्षा भोगले बॅन, जाणू घ्या सबकुछ, अमिताभचे ट्वीट आहे का मुख्य कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट डेस्क- बिनद्धास्त, गमतीशीर स्वभाव आणि खेळाप्रति निस्सीम प्रेम अशा अनेक गोष्टींमुळे हर्षा भोगले यांनी क्रिकेट कॉमेंट्रीच्या जगतात स्वतःचे एक मोठे स्थान निर्मान केले आहे. एका सामान्य अॅड एजन्सीपासून ते प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटरपर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात हर्षाला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला आहे. हर्षाला IPL मधून बाहेर केले गेले आहे. त्याचे करणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अमिताभ यांचे एक ट्वीट याला जबाबदार असल्याचे मानले जात आह.
साधारणपणे क्रिकेटर निवृत्तीनंतर कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपली कमाई आणि क्रिकेटप्रती असलेल्या आपल्या प्रितीला जीवंत ठेवतात. मात्र हर्षा या बाबतीत काहीसा वेगळा आहे, क्रिकेटमधील काही टेक्निकल बारकाव्यांच्याही पलिकडे जाऊन तो एक क्रिकेटप्रेमी या नात्याने आपले मत व्यक्त करत असतो. क्रिकेटची प्रचंड माहिती असूनही तो एखाद्या नवख्या व्यक्तीप्रमामे चर्चेला सुरुवात करतो. एवढेच नाही तर क्रिकेटला नेहमीच तटस्थ आणि वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
कदाचीत हेच कारण असावे, ज्यामुळे हर्षा आपल्याला आपलासा वाटतो. तो एखाद्या चाहत्या प्रमाणे सामन्याची कॉमेंट्री करतो. त्यामुळे आपण त्याला सहजतेने घेतो आणि कदाचित यामुळेच मागील अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या समालोचनात एक भव्य उंची गाठणाऱ्या हर्षाला आपण, तो ज्या सन्मानाचा अधिकारी आहे तो सन्मान देत नाही.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अमिताब बच्चन का होते नारात.... त्यांनी काय केले ट्वीट.... हर्षाने काय दिले उत्तर....