आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडर १९ वर्ल्डकप : युवा क्रिकेटपटूंची खाण, युवराज, कोहली, याच स्पर्धेत गवसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या २७ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत बांगलादेशात होणारी आयसीसी १९ वर्षांखालील खेळाडूंची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तमाम क्रिकेट विश्वासाठी उदयोन्मुख व भावी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची ओळख करून देणारी स्पर्धा ठरली आहे. भारताचा विराट कोहली, विंडीजचा होल्डर, दक्षिण आफ्रिकेच्या कंगिसो रबाडापर्यंतच्या अनेक खेळाडूंना या स्पर्धेने सीनियर क्रिकेट विश्वात प्रवेश मिळवून दिला.

या स्पर्धेबाबत अनेक नामवंत क्रिकेटपटूंनी आपापली मते व्यक्त केली आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कप्तान हाशिम अमला म्हणतो, या स्पर्धेच्या यशस्वीपणाची खात्री देताना आमच्या १९ वर्षांखालील वयाच्या कंगिसो रबाडा याच्यासारखे दुसरे उदाहरणच सापडणार नाही.
२००८ चा १९ वर्षांखालील विश्वचषक विजय हा माझ्यासाठी मोठाच अनुभव होता. मलेशियात झालेला तो विश्वचषक भारताने कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तोच कोहली २०११ च्या सीनियर विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघांचाही प्रमुख खेळाडू होता, हा विलक्षण योगायोग आहे, असेही आमला म्हणाला. ही स्पर्धा युवा खेळाडूंंची गुणवत्तेची खाण असते, असेही त्याने म्हटले.

अनेकांना मिळाले व्यासपीठ
बांगलादेशच्या मुशाफिकूर रहीमने २००६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात आपल्या देशाचे नेतृत्व केले होते. "आम्ही प्रथमच त्या स्पर्धेत बाद फेरीसाठी पात्र ठरलो होतो. माझ्यासह शकीब, तमीम व अन्य ३ ते ४ खेळाडू उदयास आलो. आम्ही सर्वजण देशाच्या सीनियर संघात नंतर खेळलो', असे त्याने सांगितले. वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर २०१० च्या स्पर्धेत खेळला होता.
२०१६ च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने कोहलीला आयसीसीच्या ३ वेगवेगळ्या विश्वचषक विजेत्या संघांचा सदस्य होण्याची संधी यंदा भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने आहे.
२००२ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळून मी एकूण १९१ धावा काढल्या होत्या. त्यामुळे मी प्रकाशात आलो. २०१४ च्या स्पर्धेत कॅगिसो रबाडा आफ्रिकेला गवसला.
- हाशिम आमला.

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेने मला नवी ओळख दिली. थेट प्रक्षेपणामुळे मी सर्वांना दिसलो. निवड समितीचे माझ्याकडे लक्ष गेले. या स्पर्धेने मला आत्मविश्वास दिला.
- विराट काेहली
बातम्या आणखी आहेत...