आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : IPL मधील ग्लॅमरस चीअरलीडर्स, असा असतो यांचा जलवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलच्या नवव्या पर्वाला दिमाखात सुरुवात झाली आहे. झटपट क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये अशा अनेक गोष्टींचा तडका आहे, ज्यामुळे एंटरटेनमेंट व्हॅल्यू मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यापैकीच एक म्हणजे अगदी कलरफूल कपड्यांत असणाऱ्या चीअरलीडर्स. मॅचमध्ये चौकार षटकारांची फटकेबाजील होता, प्रेक्षकांना त्यांचा ग्लॅमरस डान्स पाहायला मिळतो. प्रत्येक टीमच्या चीअरलीडर्स त्यांच्या टीमसाठी डान्स करत असतात. या चीअरलीडर्सबाबत काही वादही झालेल आहेत. त्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
चीअरलीडर्सबाबत झालेले वाद
- आयपीएलमधील चीअरलीडर्स हा सुरुवातीपासूनच एक वादाचा मुद्दा राहिलेला आहे. कधी त्यांचे कपडे तर कधी राहणीमानाच्या मुद्यावरून वाद झाले आहेत.
- 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेची चीअरलीडर गॅब्रियाला पोस्कलेटो हिने तिच्या ब्लॉगवर आयपीएलचे खेळाडू चुकीचे वर्तन करत असल्याचा आरोप केला होता. खेळाडू वाईट नजरेने आपल्याकडे पाहतात, असे लिहित तिने खळबळ माजवून दिली होती.

- 2012 मध्ये आयपीएलची टीम पुणे वारियर्स इंडियाने चीअरलीडर्सना एक नवे रूप दिले. पुण्याच्या टीमच्या चीअरलीडर्स पारंपरिक भारतीय वेशात दिसून आल्या. त्या भारतीय गाण्यांवर डान्स करायच्या.

- आयपीएल 6 मध्ये जेव्हा भ्रष्टाचार आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांचा भांडाफोड झाला तेव्हा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजे बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढच्या आयपीएलमध्ये चीअरलीडर्स नसतील असे सांगितले होते. पण तसे काही झाले नाही.

- 2014 मध्ये आयपीएलचे काही सामने यूएई (संयुक्त अरब अमिरात) मध्ये झाले. त्याठिकाणी चीअरलीडर्स चा पोशाख अत्यंत सोज्वळ होता. पण भारतात सामने होताच, सर्वकाही जैसे थे झाले.

- 2015 च्या आयपीएलदरम्यान रायपूरमधील सामन्यापूर्वी पोलिसांनी चीअरगर्ल्सच्या हॉटेलवर छापा मारला होता. पोलिसांना हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा संशय होता. पण नंतर ही रुटीन कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, IPL मधील काही चीअरलीडर्सचे PHOTOS