आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: याच दिवशी क्रिकेटच्या इतिहासात खोवला गेला मानाचा तुरा, देशभर साजरी झाली दिवाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्डकप जिंकल्यानंतर कपिल देवचे अभीनंदन करताना तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी. - Divya Marathi
वर्ल्डकप जिंकल्यानंतर कपिल देवचे अभीनंदन करताना तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी.
मुंबई : आजपासून बरोबर 33 वर्षांपूर्वी म्हणजेच २५ जून १९८३ रोजी भारतीय क्रिकेट मध्ये एक मानाचा तुरा खोवला गेला. हा दिवस भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय होता. कारण याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजचा शानदार पराभव करत पहिल्या वहिल्या विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. भारताने विश्वचषक जिंकल्यामुळे संपूर देशच जनू आनंदाने भारला होता. संबंध देशात अक्षरश: दिवाळीच साजरी झाली होती.

या विजयानंतर जेव्हा कर्णधार कपिल देवने विश्वचषक उंचावला तेव्हा सर्वच क्रिकेट चाहत्यांचा उर आनंदाने दाटून आला होता. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने अक्षरश: आकाशाला भिडली होती. या सामन्यात भारताने तब्बल ४३ धावांनी वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या वेस्ट इंडिजला केवळ १४० धावांपर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडिचचा अखेरचा बळी अमरनाथ यांनी मिळीवला. त्याच्या गोलंदाजीवर होल्डिंग बाद झाला आणि भारतीय क्रिकेट प्रेमिंनी एकच जल्लोष केला. क्रिकेटच्या इतिहासात भारताने पहिल्यांचाल विश्वचषक जिंकला होता.
पुढील स्लाइड्सवर फोटोतून पाहा, वर्ल्डकपमधील काही अविस्मरणीय क्षण... 33 वर्षांपूर्वी भारताने पहिला वर्ल्डकप जिंकल्यानंतर असा केला होता जल्लोष....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...