आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅथन लियाेनने टाकले रवींद्र जडेजाला मागे; दुसऱ्या कसाेटीत बांगलादेशवर 7 गड्यांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- अाॅस्ट्रेलियाच्या जबरदस्त फाॅर्मात असलेल्या नॅथन लियाेनने अापल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान बांगलादेशचा कसाेटी मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. त्याने दुसऱ्या कसाेटीत एकूण १३ विकेट घेतल्या.  त्यामुळे यजमान बांगलादेशला झटपट गाशा गुंडाळावा लागला. यातून मिळालेले अावाक्यातले ८६ धावांचे लक्ष्य सहज गाठूून अाॅस्ट्रेलियाने दुसरी कसाेटी जिंकली. अाॅस्ट्रेलियाने ७ गड्यांनी गुरुवारी बांगलादेशवर मात केली. यासह अाॅस्ट्रेलियाने २ कसाेटी सामन्यांची मालिका १-१ ने बराेबरीत ठेवली. बांगलादेशने सलामीच्या कसाेटीत एेतिहासिक विजय संपादन करून अाघाडी घेतली हाेती.   

बांगलादेशचा दुसऱ्या डावात अवघ्या १५७ धावांमध्ये धुव्वा उडाला हाेता. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला विजयासाठी ८६ धावांचे लक्ष्य मिळाले. अाॅस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या माेबदल्यात हे लक्ष्य गाठले. रेनेशाॅ (२२), हँडसकाेम्ब (नाबाद १६) अाणि ग्लेन मॅक्सवेल (नाबाद २५) यांनी शानदार खेळीच्या बळावर अाॅस्ट्रेलियासाठी विजयश्री खेचून अाणली. यामुळे बांगलादेशचा मालिका विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. दुसरीकडे अाॅस्ट्रेलियाला या विजयाच्या बळावर बांगलादेश दाैऱ्याचा शेवट गाेड करता अाला. सलामीच्या कसाेटीनंतर अाॅस्ट्रेलियन टीम अडचणीत सापडली हाेती. या संघाला प्रसारमाध्यमांच्या राेषाला समाेरे जावे लागले हाेते. 

नॅथन लियाेनचे सत्रात सर्वाधिक ४६ बळी 
नॅथन लियाेनने दुसऱ्या कसाेटीत धारदार गाेलंदाजी केली. यासह त्याने एकूण १३ विकेट घेतल्या. यात पहिल्या डावातील ७ अाणि दुसऱ्या डावातील ६ विकेटचा समावेश अाहे. यासह त्याने सत्रामध्ये सर्वाधिक ४६ बळी झाले. यातून त्याने टीम इंडियाच्या रवींद्र जडेजाला मागे टाकले. जडेजाच्या नावे सत्रातील ७ कसाेटींमध्ये ४४ विकेटची नाेंद अाहे. 
बातम्या आणखी आहेत...