आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ashes: Stuart Broad Becomes Fifth England Bowler To Take 300 Test Wickets

अॅशेस टेस्ट: ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 60 धावांत गारद, ब्रॉडने घेतल्या 8 विकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
300 विकेटचा टप्पा पूर्ण केल्यानतंर सहकाऱ्यांसोबत जल्लोष करताना ब्रॉड. - Divya Marathi
300 विकेटचा टप्पा पूर्ण केल्यानतंर सहकाऱ्यांसोबत जल्लोष करताना ब्रॉड.
अॅशेस सीरिजच्या चौथ्या सामन्यात यजमान इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडच्या (8 ओव्हर, 3 मेडन, 11 रन आणि 7 विकेट) करिश्माई गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला. पहिल्या डावाच्या सुरुवातीच्या 15 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे 9 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 15 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 50 रन असा होता. त्यातील फक्त दोन फलंदाज मायकल क्लार्क (10) आणि जॉन्सन (13) या दोघांनी दुहेरी धावसंख्येला स्पर्ष केला होता.
ब्रॉडने केली विश्वविक्रमाची बरोबरी
स्टुअर्ट ब्रॉडने 19 बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच महत्त्वाचे मोहरे टिपले. त्याने 300 विकेटचाही विक्रम केला आहे. त्यासोबतच त्याने सर्वात कमी बॉलमध्ये 5 विकेट काढण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या इर्नी टॉशेकच्या नावे होता. त्याने 1947 मध्ये भारतीय संघा विरोधात ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात हा रेकॉर्ड केला होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, एका पाठोपाठ एक बाद होणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि साहेबांचा जल्लोष
बातम्या आणखी आहेत...