आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Narine Suspended After Action Found Illegal

ICC ने वेस्ट इंडीजचा ऑफ स्पिनर सुनील नरेनला केले बॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आयसीसीने वेस्ट इंडीजचा ऑफ स्पिनर सुनील नरेनच्या गोलंदाजीवर पुन्हा बंदी घातली आहे. त्याची गोलंदाजी शैली अवैध आढळली असून यामध्ये तो दोषी असल्याने त्याच्यावर तत्काळ बंदीचा निर्णय घेण्यात आला. 7 नोव्हेंबरला श्रीलंकाविरुध्द वनडे सिरीजच्या शेवटच्या सामन्यात नरेनने 7.3 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेतला 24 धावा दिल्या होत्या. सामन्यानंतर अधिकाऱ्यांनी नरेनच्या बॉलिंग अॅक्शनचा रिपोर्ट वेस्ट इंडीजच्या टीम मॅनेजमेंटला दिला होता.

17 नोव्हेंबरला इंग्लंडच्या लाफबोरोर यूनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या गोलंदाजी शैलीची तपासणी झाली. यामध्ये नरेनची शैली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाच्या १५ डिग्रीपेक्षा अधिक असल्याचे आढळले. आयसीसीच्या नियमानुसार तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही.