आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunrisers Hyderabad Beat Gujarat Lions By 10 Wickets

IPL 2016: वॉर्नर धवनची अर्धशतके; हैदराबादचा १० विकेटने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (४ विकेट) दमदार गोलंदाजीनंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (नाबाद ७४) अाणि शिखर धवनच्या (नाबाद ५३) अर्धशतकाच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल-९ मध्ये गुजरात लायन्सवर १० विकेटने दणदणीत विजय मिळवला. हैदराबादचा ४ सामन्यांत हा दुसरा विजय, तर गुजरात लायन्सचा चार सामन्यांत पहिला पराभव ठरला.

सनरायझर्स हैदराबादकडून वॉर्नरने अवघ्या ४८ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ७४ धावा काढल्या. शिखर धवनने फॉर्म परत मिळवताना ४१ चेंडंूत ५ चौकारांसह नाबाद ५४ धावा ठोकल्या. दोघांनी अभेद्य १३७ धावांची भागीदारी करून विजय मिळवला. गुजरातचे गोलंदाज अपयशी ठरले.
तत्पूर्वी आयपीएल-०९ मध्ये सलग तीन सामने जिंकणाऱ्या गुजरात लायन्सने आपल्या चौथ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १३५ धावा काढल्या. गुजरातकडून कर्णधार सुरेश रैनाने दमदार फलंदाजी करताना ९ चौकारांच्या साहाय्याने सर्वाधिक ७५ धावा काढल्या. गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. सलग तीन सामन्यांत तीन अर्धशतके ठोकणारा आक्रमक सलामीवीर अॅरोन फिंच (०) लवकर बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी सुरेश रैना आणि ब्रेंडन मॅक्लुम (१८) यांनी ५६ धावांची भागीदारी केली. मॅक्लुमने १८, रैनाने ७५, तर रवींद्र जडेजाने १४ धावांचे योगदान दिले. याशिवाय त्यांच्या उर्वरित फलंदाजांना दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. फिंच (०), दिनेश कार्तिक (८), ड्वेन ब्राव्हो (८), जडेजा (१४), नाथ (५) हे फलंदाज लवकर बाद झाले. सनरायझर्स हैदराबादकडून सर्व गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यामुळे गुजरातला मोठा स्कोअर उभा करता आला नाही. त्यांच्याकडून भुवनेश्वर कुमारने २९ धावांत ४ गडी बाद केले. त्याने ११ निर्धाव चेंडू टाकले. त्याशिवाय बरिंदर सरण, मुस्ताफिजूर रहेमान, दीपक हुड्डा, विपुल शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मुस्ताफिजूरने १० निर्धाव चेंडू टाकले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, धावफलक... गुणतालिका... रैनाच्या ६००० धावा पूर्ण