आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : सनरायझर्स हैदराबादचा विजय; रैनाच्या गुजरात लायन्सवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - डेव्हिड वाॅर्नरच्या (२४) नेतृत्वाखाली यजमान सनरायझर्स हैदराबाद टीमने शुक्रवारी अायपीएल-९ मध्ये धडाकेबाज विजय संपादन केला. या टीमने अापल्या घरच्या मैदानावर सुरैश रैनाच्या गुजरात लायन्सवर ५ गड्यांनी मात केली. भुवनेश्वर कुमार (२/२८) अाणि रेहमान (२/१७) यांच्या धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ शिखर धवनच्या नाबाद ४७ धावांच्या बळावर यजमान सनरायझर्स हैदराबाद टीमने सामना जिंकला. यासह हैदराबाद संघाने लीगमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर हैदराबाद टीमने गुणतालिकेत अव्वल चारमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे गुजरात टीमचा स्पर्धेतील हा चाैथा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात लायन्सने ६ बाद १२६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने ५ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. दुखापतीमधून सावरलेल्या युवराज सिंगला ५ धावांचे याेगदान देता अाले.

नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार डेव्हिड वाॅर्नरचा हा निर्णय भुवनेश्वर कुमारने याेग्य ठरवला. त्याने सलामीवीर स्मिथला (१) झटपट बाद केले. त्यापाठाेपाठ हेन्रिक्सने मॅक्लुमला (७) झटपट बाद केले. तसेच दिनेश कार्तिक भाेपळा न फाेडताच अाल्यापावली तंबूत परतला. त्याला मुस्तफिजूर रेहमानने झेलबाद केले. त्यामुळे गुजरात टीमचा चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न अपयशी राहिला. त्यांना चांगली सुरुवात करता अाली नाही. सुरेश रैनाने १० चेंडूंचा सामना करताना एक चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे २० धावा काढल्या. ब्राव्हाे व जडेजाने प्रत्येकी १८ धावांचे याेगदान दिले. गाेलंदाजीमध्ये हैदराबादचे भुवनेश्वर कुमार अाणि मुस्तफिजूर रेहमान चमकले. त्यांनी अापल्या घरच्या मैदानावर धारदार गाेलंदाजी करताना सामन्यामध्ये प्रत्येकी दाेन गडी बाद केले.

धवनची विजयी खेळी
सनरायझर्स हैदराबाद टीमसाठी शिखर धवनने नाबाद ४७ धावांची विजयी खेळी केली. त्यामुळे यजमान हैदराबाद टीमला अापल्या घरच्या मैदानावर विजय मिळवता अाला. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना सहा चाैकारांच्या अाधारे ४७ धावा काढल्या. याशिवाय त्याने वाॅर्नरसाेबत २६ धावांची भागीदारी केली.

फिंचचे अर्धशतक व्यर्थ
गुजरात लायन्सकडून एकमेव अॅराेन फिंचला अर्धशतकी खेळी करता अाली. त्याने नाबाद ५१ धावा काढल्या. त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना तीन चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ही धावसंख्या उभी केली. याशिवाय त्याने ब्राव्हाेसाेबत ४५ धावांची भागीदारी केली.

सामन्यातील काही निवडक फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...