आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : रायझिंग पुणे टीम विजयी; दिल्लीवर ७ गड्यांनी मात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अजिंक्य रहाणेच्या (६३) नाबाद अर्धशतकाच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीमने गुरुवारी अायपीएल-९ मध्ये शानदार विजयाची नाेंद केली. धाेनीच्या नेतृत्वाखाली पुणे टीमने यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ७ गड्यांनी मात केली. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पुणे टीमचा लीगमधील हा तिसरा विजय ठरला. दुसरीकडे दिल्ली टीमला स्पर्धेत तिसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने सात गड्यांच्या माेबदल्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीमसमाेर विजयासाठी खडतर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरामध्ये पुणे टीमने तीन गड्यांच्या माेबदल्यामध्ये लक्ष्य गाठले. अजिंक्य रहाणेसह उस्मान ख्वाजा ३०, तिवारी २१, कर्णधार धाेनी २७ अाणि परेराने नाबाद ११ धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले.

पुणे टीमने नियमित कर्णधार जहीर खानच्या अनुपस्थितीमध्ये दक्षिण अाफ्रिकेच्या अाॅलराउंडर जेपी ड्युमिनीने दिल्लीचे नेतृत्व केले. धाेनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अशाेक डिंडाने धाेनीचा हा निर्णय सार्थकी लावला. त्याने सलामीच्या ऋषभ पंतला (२) त्रिफळाचीत केले. त्यानंतर संजू सॅमसन २० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार डुमिनीने संघाचा डाव सावरला. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना एका चाैकारासह ३४ धावा काढल्या. नायरने ३२ धावांचे याेगदान दिले. गत सामन्यात याच मैदानावर अर्धशतक ठाेकणारा सॅम बिलिंग्स सपशेल अपयशी ठरला. त्याला १५ चेंडूंत २४ धावा काढता अाल्या. तसेच ब्रेथवेटने ८ चेंडूंमध्ये तीन षटकारांसह २० धावांची खेळी केली.

अजिंक्य रहाणेने पाचवे अर्धशतक झळकावले
रायझिंग पुणे टीमचा स्टार सलामीवीर अजिंक्य रहाणेने गुरुवारी तुफानी फटकेबाजी करताना नाबाद ६३ धावा काढल्या. यासह त्याने यंदाच्या सत्रामध्ये पाचव्या अर्धशतकाची नाेंद अापल्या नावे केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना सात चाैकारांच्या अाधारे नाबाद ६३ धावांची खेळी केली. त्याने सलामीच्या उस्मान ख्वाजासाेबत दमदार सुरुवात करताना टीमला ५९ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. याशिवाय तिवारीसाेबत ४५ धावांची भागीदारी केली.

सामन्यातील काही निवडक फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...