आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina And Wife Priyanka Chaudhary Honeymoon Pictures

Anniversary: लग्नानंतर मधुचंद्राला नाही IPL साठी गेला होता रैना, विवाहाला झाले वर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या लग्नाला 3 एप्रिलला एक वर्ष पूर्ण झाले. रैनाची पत्नी प्रियंका चौधरीचे वडिल रैनाचे स्पोर्टस् शिक्षक होते, मात्र त्यांचे लव्ह मॅरेज नव्हते याचा खुलासा स्वतः रैनाने केला होता.

कुठे झाली होती पहिली भेट
टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा बॅट्समन सुरेश रैनाने लग्नाच्या काही तास आधी प्रियंकाबद्दल जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली होती. त्याने लग्नाबद्दल सांगितले होते, की प्रियंका माझी लहानपणाची मैत्रिण आहे. असे असले तरी मधल्या काळात अनेक वर्षे आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. प्रियंकाला मी अनेक वर्षापासून ओळखत होतो. मात्र वयाच्या 10-12 वर्षानंतर आमचा मार्ग बदलला. त्यामुळे संपर्क नव्हता. मात्र, 2008 साली अचानक प्रियंका आणि मी दिल्ली एअरपोर्टवर भेटलो. प्रियंका हॉलंड (जेथे ती बॅंकर म्हणून काम करीत होती) ला निघाली होती, तर मी आयपीएलसाठी बंगळुरूला चाललो होतो. एअरपोर्टवर फक्त पाच मिनिटांसाठी आमची भेट झाली. त्याआधी लहानपणीच आम्ही भेटलो होतो.

बालपणाची ओळख, मात्र अॅरेंज मॅरेज
गाजियाबादमध्ये प्रियंकाचे वडिल रैनाचे स्पोर्ट्स शिक्षक होते. त्याची आई आणि प्रियंकाची आई चांगल्या मैत्रिण आहेत. त्यांचे कुटुंबिया एकमेंकाना फार वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे हे लग्न एक टिपिकल अॅरेंज मॅरेज असल्याचे रैनाने लग्नाच्या काही तास आधी सांगितले होते.

पुढील स्लाइडमध्ये, IPL नंतर मधुचंद्र