आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्निया वृत्तीने सर्वांनाच बसला होता धक्का; रैना, विराट रात्रभर होते सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महेंद्रसिंग धोनीच्या कसोटीतील निवृत्तीनंतर जवळपास एक वर्षाने सुरेश रैनाने यावर खुलासा केला आहे. धोनीचा निवृत्तीचा निर्णय आम्हा सर्वांसाठी धक्का देणारा होता. धोनीने हा निर्णय अचानक घेतल्याने ती वेळ कठीण होती. त्याने निवृत्तीच्या आधी याबाबत कोणालाच काही सांगितले नव्हते, असे रैनाने एका मुलाखतीत स्पष्ट केले.

धोनीने जर्सी दिली
निवृत्तीच्या आदल्या रात्री धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, माझ्याकडे एक एक्स्ट्रा लार्ज (XXL) जर्सी आहे. ही तू ठेवून घे. धोनी काहीतरी करणार आहे, याचा अंदाज मला त्या वेळी आला होता. मी त्याला त्या जर्सीवर साइन करण्यास सांगितले. पुढच्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला सर्व एकत्र होतो. धोनीसुद्धा होता. मात्र, तो एकदम शांत होता. कोणाशीच काहीच बोलत नव्हता. माझी शंका बळावली की आज काहीतरी गडबड निश्चित होणार आहे, असे रैना म्हणाला. धोनीची देहबोली, वागणुकीवरून रैनाला शंका आली होती की तो काहीतरी वेगळे करणार आहे. त्याने निवृत्तीच्या आधी खेळाडूंना काहीही सांगितले नाही. त्याने अचानक घोषणा केली, असे रैना म्हणाला.

खेळाडूंना बोलावून केली घोषणा
कसोटी संपताच धोनीने सर्व खेळाडूंना काही बोलायचे आहे, असे सांगून बोलावून घेतले. मला अंदाज आला की तो निवृत्ती घेणार आहे. सर्वांना बोलावून अत्यंत भावुक आवाजात धोनी म्हणाला, "यानंतर मी ही पांढरी जर्सी कधीच घालणार नाही. मी निवृत्ती घेत आहे.' त्या रात्री धोनी पांढऱ्या जर्सीवरच झोपला होता. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्या वेळी संपूर्ण रात्रभर मी, ईशांत, अश्विन, कोहली त्याच्या खोलीत बसून होतो. आमच्या सर्वांसाठी तो मोठा धक्का होता, असेही यावेळी सुरेश रैना म्हणाला.

९० व्या सामन्यात निवृत्ती
धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात मेलबर्न कसोटी खेळल्यानंतर अखेरच्या दिवशी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. तो त्याच्या कारकीर्दीतील ९० वा कसोटी सामना होता.