आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० सामन्यांचा आता थरार रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटच्या सर्वात छाेट्या फाॅरमॅटने यंंदा २०१६ च्या नव्या सत्राला सुरुवात हाेणार आहे. टी-२० ची राष्ट्रीय चॅम्पियनशिप सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धा शनिवारपासून रंगणार आहे. आयसीसीच्या आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही स्पर्धा टीम इंडियामधील काही दिग्गज खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली जात आहे. येत्या ८ मार्चपासून भारतात विश्वचषकाला प्रारंभ हाेईल.

मुश्ताक अली ट्राॅफीतील गटाच्या सामन्यांचे आयाेजन २ ते १० जानेवारीदरम्यान करण्यात आले. त्यानंतर १५ जानेवारीपासून सुपर लीगच्या सामन्याला सुरुवात हाेईल. तसेच या स्पर्धेची फायनल २० जानेवारी राेजी हाेणार आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.

युवी, हरभजन, नेहराला संधी
युवराजसिंग, हरभजनसिंग आणि आशिष नेहरा हे आगामी आॅस्ट्रेलिया दाैऱ्यात टी-२० मालिकेच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांना मुश्ताक अली ट्राॅफीच्या माध्यमातून आॅस्ट्रेलिया दाैऱ्याची तयारी करण्याची संधी आहे. पंजाब टीमचे नेतृत्व करत असलेल्या हरभजनसिंगसमाेर राजस्थानचे आव्हान असेल. तसेच आशिष नेहरा हा दिल्लीचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या टीमचा सामना रेल्वेविरुद्ध रंगणार आहे.
बातम्या आणखी आहेत...