आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 Series: Duplesis Make Possible Victory To South Africa

टी-२० मालिका: डुप्लेसिसच्या खेळीने द. आफ्रिका विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: विजयानंतर जल्लोष करताना आफ्रिकेचे डुमिनी आणि ए. बी. डिव्हिलर्स.)
मीरपूर - फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली दक्षिण अाफ्रिका टीमने रविवारी बांगलादेशविरुद्ध धडाकेबाज विजयाची नाेंद केली. दक्षिण अाफ्रिकेने सलामीच्या टी-२० सामन्यात ५२ धावांनी विजय संपादन केला. याशिवाय अाफ्रिकेच्या टीमने बांगलादेशविरुद्ध दाेन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा अाणि निर्णायक सामना मंगळवारी हाेणार अाहे.

फाफ डुप्लेसिसच्या (नाबाद ७९) झंझावातापाठाेपाठ राबाडा (२/२८), डेव्हिड विसे (२/१२) अाणि जेपी डुमिनीने (२/११) केलेल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर अाफ्रिकेने १८.५ षटकांत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या दक्षिण अाफ्रिका संघाने चार गड्यांच्या माेबदल्यात १४८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा धारदार गाेलंदाजीमुळे अवघ्या ९६ धावांत धुव्वा उडाला. बांगलादेशकडून सकिब अल हसनने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही.

धावांचा पाठलाग करणा-या बांगलादेशची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर तमीम इक्बाल (५) अाणि साैम्या सरकार (७) ही जाेडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर सकिबने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला साथ देणा-या रहीम (१७), शब्बीर रेहमान (४), नासेर हुसेन (१) यांना फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. अांतरराष्ट्रीय टी-२० करिअरला सुरुवात करणा-या लिटट्न दासने २२ धावांची खेळी केली.

गाेलंदाजीत रबाडा, डेव्हिड विसने अाणि डुमिनीने शानदार कामगिरीच्या बळावर प्रत्येकी दाेन गडी बाद केले. तसेच पार्नलने एक गडी बळी घेतला.

डुप्लेसिसचा धमाका
कर्णधार फाफ डुप्लेसिसने अर्धशतकी धमाका उडवून दक्षिण अाफ्रिकेच्या विजयात माेलाची भूमिका बजावली. त्याने ६१ चेंडूंचा सामना करताना अाठ चाैकारांच्या अाधारे नाबाद ७९ धावा काढल्या. या वेळी त्याला जेपी डुमिनी (१८) अाणि राेस्साेवने (नाबाद ३१) माेलाची साथ दिली. त्यामुळे अाफ्रिकेला बांगलादेशविरुद्ध सन्मानजनक अशी धावसंख्या उभी करता अाली.