आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा नवा स्टार चहलची बेडरूम, पाहा घराचे INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युजवेंद्र चहलचा बेडरूम... - Divya Marathi
युजवेंद्र चहलचा बेडरूम...
जिंद (हरियाणा)- भारताने तिस-या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडला 75 धावांनी हारवून तीन मॅचेसची सीरीज 2-1 अशी जिंकली. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो राहिला हरियाणाचा युजवेंद्र चहल. चहलने मॅचमध्ये 4 षटकात 25 धावा देत 6 विकेट घेतल्या. चहलच्या या कामगिरीवर त्याचे आई-वडिल खूपच खूष झाले. जाणून घ्या, कोण कोण आहे चहलच्या फॅमिलीत...
 
- युजवेंद्र मूळचा हरियाणातील जिंद जिल्ह्यातील दरियावाल गावचा आहे. 
- त्याचे वडिल जिंदमधील पटियाला चौकात राहतात. ते एका मध्यमवर्गीय परिवारातील आहेत.
- युजवेंद्रचे वडिल के के चहल जिंद कोर्टात वकिल आहेत तर आई सुनीता देवी गृहिणी आहे. 
- परिवारात युजवेंद्र सर्वात छोटा आहे. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत ज्या ऑस्ट्रेलियात राहतात. 
 
शेतात पिच बनवून वडिल करून घ्यायचे सराव-
 
-  युजवेंद्रच्या कालच्या सामन्यातील कामगिरीबाबत त्याचे वडिल के के चहल आणि आई सुनीता देवी खूपच खूष आहेत. 
- रात्रीपासून त्यांना जवळच्या नातेवाईकांचे आणि मित्रपरिवाराचे फोन येत आहेत.  
- युजवेंद्रबाबत बोलताना त्याचे वकिल पिता म्हणतात, ''माझे स्वप्न होते की, मुलाने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवावे. त्याने क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी झोकून दिले. ''
- ''शिक्षणात त्याला फरसा रस नव्हता.''
- ''2004 मध्ये मी आमच्या दीड एकर जमिनीत पिच बनवली व तेथेच सराव सुरु केला.  
- ''2011 पर्यंत त्याने तेथेच सराव केला. जेव्हा त्याचे अंडर-19 मध्ये सिलेक्शन झाले तेव्हा वाटले की आपला मुलगा आपले स्वप्न साकार करेल.''
- ''यानंतर त्याचे रणजी ट्राफी, आयपीएल आणि आता भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.''
- मुलाच्या कामगिरीबाबत आनंदी आई-वडिलांनी सांगितले की, ‘अखेर युजवेंद्रच्या कष्टाचे चीज झाले. आमचे स्वप्न पूर्ण झाले.’
 
भात- राजमा युजवेंद्रची फेवरिट डिश
 
- युजवेंद्रची आई सुनीता देवींनी सांगितले की, खाण्यात त्याला भात-राजमा आणि लसणाची चटनी आवडते. 
- जेवणात दोन्ही वेळीच त्याला लसणाची चटणी लागते. दुध पिण्यास तो कधीच नाही म्हणत नाही. 
- आधी अंडी खात नव्हता पण कोचने मसल्स प्रॉब्लेम सांगत नॉनव्हेज खायला लावले. 
 
सभी फोटोः विजेंद्र मराठा
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अन्य फोटो...
बातम्या आणखी आहेत...