आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-अ युवा संघाचा बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला धक्का !, अग्रवालची तुफानी खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मयंक अग्रवाल (८७) आणि मनन वोहरा (५६) यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारत अ युवा संघाने जबरदस्त प्रदर्शन करताना पाहुण्या बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला ८ विकेटने पराभवाचा धक्का दिला. पाहुण्या संघाचा भारत दौऱ्यावरील हा पहिलाच सामना होता. झटपट क्रिकेटमध्ये "हम भी कुछ कम नहीं' हे युवा ब्रिगेडने सिद्ध केले. आयपीएलचा अनुभव कामी येत असल्याचे या विजयाने जाहीर झाले.
द. आफ्रिका संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जे. पी. डुमिनीच्या नाबाद ६८ धावांच्या बळावर या टी-२० सराव सामन्यात आफ्रिकेने ३ बाद १८९ धावांचा स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात भारत अ संघाने १९.४ षटकांत २ बाद १९३ धावा काढून शानदार विजय मिळवला.
भारत अ संघाच्या विजयात मयंक अग्रवाल आणि मनन वोहरा यांनी सिंहाचा वाटा उचलला. दोघांनी ११९ धावांची सलामी दिली. वोहराने ४२ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा काढल्या. यात त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. वोहरा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवालने संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावा जोडून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर उभे केले. अग्रवालने ४९ चेंडूंत ८७ धावा ठोकल्या. सॅमसनने नाबाद ३१ आणि कर्णधार मनदीप सिंगने नाबाद १२ धावा काढून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

आफ्रिकेकडून जे.पी. डुमिनीचे अर्धशतक
तत्पूर्वी, द. आफ्रिका संघाने जे. पी. डुमिनीच्या ३२ चेंडूंतील नाबाद ६८ धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर ३ बाद १८९ धावा काढल्या. डुमिनीचा एक षटकार कॉम्प्लेक्सच्या बाहेर रस्त्यावर जाऊन पडला. डुमिनीशिवाय ए. बी. डिव्हिलर्सने २७ चेंडूंत ३ चौकार, २ षटकारांच्या साह्याने ३७ धावा ठोकल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने २७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ४२ धावा काढल्या. तो निवृत्त झाला. फरहान बेहर्दिनने २० चेंडूंत नाबाद १७ धावा जोडल्या. क्विंटन डी. कॉक २ धावांवर धावबाद झाला.

धावफलक
दक्षिण आफ्रिका धावा चेंडू ४ ६
डिव्हिलर्स झे. नेगी गो. कुलदीप ३७ २७ ३ २
डी.कॉक धावबाद ०२ ०३ ० ०
डुप्लेसिस निवृत्त ४२ २७ ७ ०
जे.पी. डुमिनी नाबाद ६८ ३२ २ ६
डेव्हिड मिलर त्रि. गो. पंड्या १० ११ १ ०
बेहर्दिन नाबाद १७ २० १ ०
अवांतर : १२. एकूण : २० षटकांत ३ बाद १८९ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-३, २-९०, ३-१०६.
गोलंदाजी : अनुरीत ४-०-४९-०, ऋषी धवन ३-०-३३-०, यजुवेंद्र चहल ४-०-३१-०, नेगी ३-०-२६-०, कुलदीप यादव ४-०-२६-१, हार्दिक पंड्या २-०-१६-१.

भारत अ धावा चेंडू ४ ६
मनन वोहरा झे. बेहर्दिन गो. डुमिनी ५६ ४२ ८ १
मयंक अग्रवाल झे. मिलर गो. लेंगे ८७ ४९ १२ २
संजू सॅमसन नाबाद ३१ २२ २ १
मनदीप सिंग नाबाद १२ ०७ २ ०
अवांतर : ७. एकूण : १९.४ षटकांत २ बाद १९३ धावा. गडी बाद होण्याचा कम : १-११९, २-१७१.
गोलंदाजी : अॅबोट ४-०-४३-०, राबाडा ३-०-३३-०, क्रिस मोरिस ३-०-२०-०, लेंगे २.४-०-२५-१, ताहिर ३-०-२६-०, लेई २-०-२३-०, जे.पी. डुमिनी २-०-२२-१.