आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज टी-२० सराव सामना : भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांत दिल्लीत होणार लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाहुणा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ तब्बल ७२ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आला आहे. भारत अ संघाविरुद्ध टी-२० सराव सामना खेळून आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होईल. आफ्रिकेचा मजबूत टी-२० संघ भारताच्या युवा टी-२० संघासोबत दोन हात करेल. ही सराव लढत नवी दिल्लीच्या मैदानावर मंगळवारी होईल. या सामन्यानंतर पाहुणा संघ धर्मशाला येथे रवाना होईल. ही मालिका महान राष्ट्रनेते महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना समर्पित आहे.
आफ्रिकेची टीम त्यांचा युवा खेळाडू फॉप डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली टी-२० सामना खेळेल, तर भारत अ संघाची मदार युवा तडफदार खेळाडू मनदीपसिंगकडे सोपवण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांत क्रिकेट मालिकेला सुरुवात होत असून यापूर्वी भारताच्या वातावरणाशी एकरूप होण्याची संधी पाहुण्या संघाकडे असेल. भारत व द. आफ्रिकेदरम्यान २ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे टी-२० सामना होईल.

आफ्रिकेची टीम मजबूत
पाहुणा दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ खूपच मजबूत आहे. त्यांच्याकडे कर्णधार फॉप डुप्लेसिस, कसोटी कर्णधार हाशिम आमला, वनडे कर्णधार एल्बी डिव्हिलर्स, लेगस्पिनर इम्रान ताहिर व डुमिनीच्या रूपाने पाच अनुभवी खेळाडू संघात सामील आहेत. हे सर्व तिन्ही स्वरूपात खेळताना आफ्रिका संघाचे सदस्य आहेत. त्यांच्याशिवाय डेव्हिड मिलर, क्विंटन डी. कॉक यांच्या समावेशाने आफ्रिकेचा टी-२० संघ मजबूत आहे. नवी दिल्लीतील पालमच्या मैदानावर ही लढत होईल.

आमला, मोर्कल पोहोचले नाहीत
द. आफ्रिकेचा कसोटी कर्णधार हाशिम आमला आणि गोलंदाज एल्बी मोर्कल अजून भारतात दाखल झालेले नाहीत. आमला वैयक्तिक कारणांमुळे सराव सामन्यानंतर भारतात येईल, तर मोर्कलला अजून व्हिसा मिळालेला नाही. मोर्कलला अखेरच्या क्षणी डेव्हिड व्हिनसीच्या जागी संघात सामील करण्यात आले.
दोन्ही संघ असे
भारत अ : मनदीप सिंग (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनन वोहरा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, ऋषी धवन, अनुरीत सिंग, यजुवेंद्र चहल, पवन नेगी, कुलदीप यादव.

द. आफ्रिका : डुप्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, फरहान बेहर्दिन, क्विंटन डी. काॅक, डी लेंगे, डिव्हिलर्स, जे.पी. डुमिनी, इम्रान ताहिर, ईडी लेई, केली अॅबोट, डेव्हिड मिलर, क्रिस मोरिस, के. राबाडा, एल्बी मोर्कल, खाया झोंडा.

महेंद्रसिंग धोनीच्या रणनीतीचे आव्हान : फॉप डुप्लेसिस
धोनी जगप्रसिद्ध कर्णधार आहे. त्याची रणनीती फ्लॉप करण्याचे कठीण आव्हान आमच्यासमोर असेल. धोनी स्वभावाने शांत असला तरीही दबावाच्या वेळी तो जबरदस्त खेळ करतो. धोनीचे नेतृत्व खूप आक्रमक असते. भारतीय संघ आक्रमक रणनीतीसह खेळेल, असे मला वाटते. आमचीही टीम मजबूत आहे, असे द. आफ्रिकेचा कर्णधार फॉप डुप्लेसिसने पत्रकार परिषदेत म्हटले. धोनी मैदानावर गोलंदाजांनाही मार्गदर्शन करतो. ताे फार चतुर कर्णधार आहे, असेही तो म्हणाला.