कोलकाता- 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या विराट कोहलीचा (55*) धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर
टीम इंडियाने शनिवारी ईडन गार्डनवर पाकिस्तानला धूळ चारली. टी-20 वर्ल्डकप मध्ये भारताने पाकला सहा विकेटने नमवले. टीम इंडियाचा ग्रुप-2 मध्ये हा पहिला विजय आहे.
भारताने टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकला पाचव्यांदा हरवले. या विजयानंतर भारताने जणू काही वर्ल्डकप जिंकला आहे, अशा धुंदीत चाहत्यांनी जल्लोष केला.
पावसाचा व्यत्यय असलेल्या सामन्यात भारताने पाकला 18 षटकांत 5 बाद 118 धावांवर रोखले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताने 15.5 षटकांत 4 बाद 119 धावा काढून विजय मिळवला.
युवी-कोहलीची भागीदारी: कोहलीने युवीसोबत (24) 61 धावांची भागीदारी केली. यानंतर धोनीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करताना 16 व्या षटकात षटकार ठोकून स्कोअर बरोबर केला. यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेऊन विजय निश्चित केला.
टीम इंडियाच्या विजयाचा विराटच नव्हे तर हे देखील आहेत हीरो...
- युवराज सिंग
- सुरेश रैना
- रवींद्र जडेजा
- हार्दिक पांड्या
सामन्याचे टर्निंग पॉईंट्स...
- आफ्रिदीचा झेल
- महागात पडले समीचे ओव्हर
पावसानंतर पिचवर टर्न होत होता बॉल...
- कोलकात्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-पाक लडत 18-18 षटकांची झाली.
- पावसानंतर पिचवर बॉल टर्न होत होता. त्याचा फायदा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी घेतला. भारताने पाकिस्तानी संघाला 18 षटकात 5 बाद 118 धावांवर रोखले.
- पाकिस्तानकडून शोऐब मलिकने सर्वाधिक 26 धावा केल्या. शहजादने 25, अकमलने 22 तर शारजील खानला 17 धावा करता आल्या.
- इंडियाकडून आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा, सुरेश रैना व पांड्याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतले.
विराटपुढे पाकने टेकले गुढघे...
- 23 धावांवर भारताचे तीन गडी तंबूत परतले होते. तेव्हा विराट कोहलीने शिवधनुष्य यशस्वी पेलून धले. धडकेबाज नाबाद अर्थशतक (55*) ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
- युवराज सिंगने 24 तर रोहित शर्माने 10 धावा केल्या.
- युवराज व विराट या जोडीने 7.2 षटकांत 61 धावांची शानदार भागिदारी केली.
- शिखर धवनला केवळ सहा धावा करता आल्या. सुरेश रैनाला मात्र एकही धाव करण्याची संधी मिळाली नाही.
- कर्णधार एमएस धोनीने 9 चेंडूवर 13 धावा करून नाबाद ठरला.
- पाकिस्तानकडून मोहम्मद समीने दोन तर आमिर व रियाजला प्रत्येकी एक -एक विकेट घेतले
- भारतविरुद्ध बांगलादेश ही लढत 23 मार्चला बंगळुरु येथे होणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, टीम इंडियाच्या विजयाचे हीरो व सामन्याचे टर्निंग पॉईंट्स...