आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#IndvsPak: सचिन-इम्रान, अमिताभसह खेळाडूंचा झाला सत्‍कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/ नवी दिल्ली - टी-20 वर्ल्डकपमधील मिनी सेमीफायनल म्हटल्या जाणाऱ्या भारत-पाक सामन्याची ईडन गार्डनवर तयारी केली जात आहे. पाऊस थांबल्‍यानंतर मैदान वाळवण्‍याचा प्रयत्‍न केला जातोय. हायहोल्टेज मॅच पाहाण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे अनेक स्टार्स कोलकात्यात आले आहेत. सामन्‍याच्‍या आधी सचिन तेंडुलकर, इमरान खान, वसीम अकरम, सुनील गावस्‍कर यांच्‍यासह अनेक खेळाडूंचा ममता बॅनर्जी यांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला. यावेळी अमिताभ बच्चन यांचाही गौरव करण्‍यात आला. आतापर्यंतचे अपडेट्स...
7:55 PM : 8 वाजून 10 मिनीटानी नाणेफेक होणार. सामना 18-18 ओव्‍हर्सचा करण्‍यात आला.
7:45 PM : गौरवानंतर इम्रान खान भाषण देत आहे. त्‍यानंतर सचिन तेंडुलकर मनोगत व्‍यक्‍त करतील.
7:20 PM : रात्री आठ वाजता होऊ शकते नाणेफेक, सव्‍वा आठ नंतर मॅच सुरू झाल्‍यानंतर ओव्‍हर कमी केले जाऊ शकतात.
7:20 PM :सचिन तेंडुलकर मुकेश आणि नीता अंबानीसोबत कोलकातामध्‍ये पोहोचले आहेत.
7:12 PM :मैदानाचा तिप्‍पट भाग कोरडा करण्‍यात आला आहे.
7:02 PM :कोलकातामध्‍ये मैदान वाळवण्‍यात येत आहे.
6:58 PM :दिल्लीमध्‍ये पाकिस्तान महिला संघाने भारताला 2 धावांनी पराभूत केले.
6:38 PM :ग्राउंडवरून कव्‍हर हटवण्‍यात येत आहेत.
6:32 PM : पाऊस थांबला. एक तास उशीराने मॅच सुरू झाली तरी 20-20 ओवरचा सामना होईल.6:20 PM : पुन्‍हा एकदा कोलकातामध्‍ये पावसाला सुरूवात झाली आहे.
6:15 PM : भारत आणि पाकचे खेळाडू ईडन गार्ड्न्सला पोहोचले.
6:13 PM : दिल्लीच्‍या फिरोजशाह कोटला मैदानात भारत-पाक महिला संघाची मॅच पावसामुळे थांबली. भारताने 96 धावा काढल्‍या आहेत. प्रतीक्षा पाकने 16 ओव्‍हरमध्‍ये 76 धावा काढल्‍या.
6:07 PM : कोलकातामध्‍ये पाऊस पूर्णपणे थांबला.
6:05 PM : अमिताभ बच्चन स्टेडियमवर पोहोचले.
5:55 PM : पाऊस पुन्‍हा सुरू झाला.

>> मॅच झाली नाही तर काय होणार ?
- मॅच रद्द झाल्यास पाकिस्तानला 3 गुणांवर पोहोचेल. तर, भारताचे 1 गुणाने खाते उघडेल.
- यामुळे भारत सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग अवघड होईल. अजून भारताचा बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियासोबत सामना होणे बाकी आहे.
- जर भारताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे पाच गुण होतील.
- तसे झाल्यास भारताचे भविष्य उर्वरित संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहिल.
आता काय आहे भारताची स्थिती
- न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकून 4 गुण मिळविले आहेत.
- पाकिस्तानने बांगलादेशाला पराभूत करुन 2 गुण पदरी पाडून घेतले आहेत.
- भारत, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशाने एक-एक मॅच गमावली आहे. तिन्ही संघाकडे एकही गुण नाही.
भारतीय महिला संघाचे पाकला 97 धावांचे लक्ष्य
फिरोज शहा कोटला मैदानावर वूमन्स वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला 97 धावांचे लक्ष्य दिले आहे. व्ही कृष्णमुर्तीने सर्वाधिक 24 धावा केल्या. पाकिस्तान टीम लक्ष्याचा पाठलाग करत आहे. दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिलेल्या कोलकत्यात वरुण राजाचे पुन्हा आगमन झाले आहे. सगळीकडे अंधार दाटला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान संध्याकाळी 7.30 वाजता कोलकात्यात आमने-सामने असणार आहे. त्याआधी महिला वर्ल्डकपमध्ये दिल्लीत भारतीय संघाचा सामना पाकिस्तानसोबत होत आहे.

इम्रान खान शाहिद आफ्रिदीच्या मदतीसाठी कोलकात्यात
पाकिस्तान टीमचा माजी कर्णधार इम्रान खान शाहिद आफ्रिदीच्या मदतीसाठी कोलकात्यात पोहोचला आहे. वसीम अकरम देखिल टीमच्या मदतीसाठी आला आहे. दुसरीकडे कोलकात्यात शनिवारी सकाळी सुरु झालेला पाऊस दुपारी थांबला होता तर सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा हजेरी लावली आहे.

काय म्हणाला इम्रान खान
- डॉन न्यूजच्या वृत्तानूसार, कोलकात्यात पोहोचल्यानंतर इम्रान म्हणाला, 'शाहिदला माझ्या मदतीची गरज आहे. परंतू मला माहित नाही की पाकिस्तान टीम कोणत्या आव्हानांचा सामना करत आहे. मात्र मी माझ्या अनुभवाच्या जोरावर त्यांची मदत करेल,याचा मला विश्वास आहे.'
- इम्रान म्हणाला, 'मी टीमला सांगेल की दबावात खेळू नका.'
- त्याचबरोबर, पावसानंतर मॅचच्या शक्यतेबद्दल विचारल्यावर मनोज तिवारी म्हणाले, कोलकाताच्या ईडन गार्डनवर ड्रेनेज व्यवस्था आणि कव्हर योजना अतिशय चांगली आहे. तिथे सामना होण्यास काहीही अडचण नाही.

ईडन गार्डन पाकसाठी लकी
कोलकात्यातील ईडन गार्डन हे आतापर्यंत पाकिस्तान टीमसाठी लकी ठरले आहे. या टीमने या मैदानावर भारतविरुद्ध झालेल्या चारही सामन्यांत विजयी पताका फडकावली आहे. यात 1987, 1989, 2004, आणि 2013 मधील सामन्यांचा समावेश आहे.
यांचा होणार सन्मान
- सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड़, इंतिखाब आलम, इमरान खान, वकार युनूस आणि वसीम अकरम.
- वीरेंद्र सहवागलाही त्याच्या क्रिकेटमधील योगदानासाठी सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील संघटना सन्मानित करणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा.. >> अमिताभ-शफाकत गाणार राष्ट्रगीत
>>गांगुली भेटला टीम इंडियाला >> ईडन गार्डनआधी दोन्ही संघांची स्थिती
>> मियांदादला आवडले नाही आफ्रिदीचे 'प्रेम' >>कोहली आणि मोहम्मद आमिर यांची भेट >>टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान >>केव्हा, कुठे आणि किती अंतराने जिंकला भारत >>सनाचा आफ्रिदीवर निशाणा >>बॉलिवूडवर क्रिकेटचे रंग >>66 हजार फॅन्स येणार