आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाका : चार चेंडूत गाठले 89 धावांचे लक्ष्य, वाचा कशी अन् कोणी केली ही विक्रमी कामगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
ढाका - क्रिकेट जगत मंगळवारी एका अशा विक्रमाचे साक्षीदार बनले जो विक्रम क्रिकेटच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात कोणी पाहिला नव्हता. किंबहुना असे काही घडू शकते असा विचारही कोणी केला नसेल. हा विक्रम म्हणजे 89 धावांचे विजयाचे लक्ष्य अवघ्या चार चेंडूत गाठण्याचा. हा विक्रम घडला ढाका प्रिमियर लीगमध्ये. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या विक्रमाची नोंद होणार नसली तरीही, क्रिकेट जगतासाठी मात्र ही एक अनोखी बाब आहे. 

ढाका प्रिमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील एका सामन्यात लालमाठिया क्लबने प्रथम फलंदाजी करताना 14 ओव्हर्समध्ये सर्वबाद 88 धावा काढल्या. पण प्रत्युत्तरात एक्झिम क्रिकेटर्स संघाने अवघ्या चार चेंडूत 89 धावांचे लक्ष्य गाठले. आता ही कामगिरी कशी केली असा विचार येत असेल तर, गोलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल 80 वाईट चेंडू टाकले. लालमाठिया क्लबच्या या गोलंदाजाचे नाव सुजान मेहमूद असे आहे. त्यामुळे विरोधी संघाने चार चेंडूतच लक्ष्य गाठले. मात्र वाईड चेंडू पडले नाहीत, तर मुद्दाम टाकले, त्यामागेही एक कारण आहे. 

पंचांचा निषेध करण्यासाठी 
सामन्यामध्ये पंचगिरी करणाऱ्या दोन्ही पंचांनीही लालमठिया क्लबच्या फलंदाजीच्या वेळी अत्यंत सुमार फलंदाजी करण्याचा आरोप क्लबने लावला. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून लालमठिया संघाच्या सुजान मोहम्मदने तब्बल 80 वाईड चेंडू टाकले. त्यानंतरच्या चार चेंडून एक्झिमच्या संघाने 9 धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...