आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team Australia Is Scheduled To Have Its First Practice Session On February 15 At Mumbai.

इतक्या लगेजसह ऑस्ट्रेलिया टीम भारतात, एयरपोर्टवर या अंदाजात दिसले क्रिकेटर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ मुंबई विमानतळावर लगेज उचलताना दिसला. - Divya Marathi
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ मुंबई विमानतळावर लगेज उचलताना दिसला.
मुंबई - स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया टीमचे सोमवारी भारतामध्ये आगमन झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. पुण्याच्या मैदानावर सलामीच्या कसोटीचे आयोजन करण्यात आले.
 
ऑस्ट्रेलिया संघाने फॉर्मात असलेल्या टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी दुबईमध्ये केली. दुबईतील आपले सराव आणि प्रशिक्षण शिबिर पूर्ण केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू भारतामध्ये दाखल झाले. गुरुवारपासून ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रेबोर्न मैदानावर सरावाला सुरुवात करतील. १७ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियन टीम भारत संघाविरुद्ध एक सराव सामना खेळणार आहे. 
 
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया सीरीजचे वेळापत्रक-
 
फेब्रुवारी 16-18: प्रॅक्टिस मॅच Vs इंडिया-ए, सीसीआय, मुंबई 
फेब्रुवारी  23-27: पहिली कसोटी, पुणे 
मार्च 4-8: दुसरी कसोटी, बंगळुरु 
मार्च 16-20: तिसरी कसोटी, रांची 
मार्च 25-29: चौथी कसोटी, धर्मशाळा
 
भारत दौ-यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियन टीम-
 
 स्टीव स्मिथ (कर्णधार), डेविड वार्नर, मॅथ्यू रेनेशॉ, शॉन मार्श, पीटर हॅंड्सकोंब, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड, स्टीव ओकीफे, मिशेल स्टार्क, नाथन लियोन, जोस हेजलवुड, एस्टॉन एगर, उस्मान ख्वाजा, जॅक्सन बर्ड, मिशेल स्वेपसन, ग्लेन मॅक्सवेल.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुंबई एयरपोर्टवर अशा अंदाजात दिसले ऑस्ट्रेलियन प्लेयर्स...
बातम्या आणखी आहेत...