आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL9: मुंबईचे सलामीला पानिपत; पुणे सुपरजायंट्स अजिंक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्दिक पांड्या. - Divya Marathi
हार्दिक पांड्या.
मुंबई - नवव्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रथमच नशीब अाजमावणारा रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ शनिवारी सलामीला अजिंक्य ठरला. महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वात पुणे टीमने स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. अजिंक्य रहाणेच्या (६६) नाबाद अर्धशतकाच्या बळावर पुणे टीमने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर गड्यांनी मात केली.
प्रथम फलंदाजी करताना राेहित शर्माच्या नेतृत्वात यजमान मुंबई इंडियन्सने षटकांत १२१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणे अाणि पीटरसनच्या शानदार खेळीमुळे पुणे टीमने गड्याच्या माेबदल्यात १४.४ षटकांमध्ये लक्ष्य गाठले.
धावांचा पाठलाग करणाऱ्या पुणे टीमकडून अजिंक्य रहाणे अाणि फाफ डुप्लेसिसने दमदार सुुरुवात केली.

यजमान मुंबई इंडियन्सचे लढतीचे डावपेच प्रारंभापासूनच चुकत गेले. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. डाव सावरणारा अंबाती रायडू (२२) बाद झाला तेव्हा त्यांची अवस्था बाद ६८ अशी झाली. मात्र, हरभजनसिंग मदतीला धावून आला. त्याने चौकार षटकारासह नाबाद ४५ धावा फटकावल्या. त्यामुळे धावांचे शतक दुर्मिळ असणाऱ्या मुंबई इंडियन्सला २० षटकांत बाद १२१ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. गोलंदाजी, क्षेत्रव्यूह आणि डावपेच यशस्वी लढवणाऱ्या पुण्याच्या कप्तान धोनीने अनुभवी रविचंद्रन अश्विनला एकमेव षटक गोलंदाजी दिली. आयपीएल पदार्पण करणाऱ्या अश्विनने षटकांत विकेटही घेतली.
संक्षिप्तधावफलक : मुंबई: बाद १२१, पुणे सुपरजायंट्स : बाद १२६.

अजिंक्यचे नाबाद अर्धशतक
पहिल्यांदाच खेळणाऱ्या पुणे टीमकडून अजिंक्य रहाणेने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे टीमला विजय साकारता अाला. त्याने ४२ चेंडूंत चाैकार तीन षटकारांसह नाबाद ६६ धावा काढल्या. याशिवाय त्याने डुप्लेसिससाेबत (३४) ७८ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर त्याने पीटरसनसाेबत (नाबाद २१) दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य ४८ धावांची भागीदारी करून सामना जिंकला.

....अन रवी शास्त्रींना अटकाव!
गेले कित्येक महिने हातात माइक घेता क्रिकेट किट घेऊन भारतीय संघाला प्रशिक्षण देणारा रवी शास्त्री आज पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत अवतरला. मात्र, त्याच्या या भूमिकेचे बऱ्याच जणांना विस्मरण झाले असावे. कारण मैदानात माइक घेऊन आत शिरताना त्याला अटकाव करण्यात आला. पास विचारण्यात आला. शास्त्रीने त्याच्याकडे यत्किंचित नजरेने पाहिले हाताने झिडकारून तो पुढे निघून गेला.