आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दाैरा; साेमवारी संघाची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बांगलादेशविरुद्ध मालिका पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दाैरा करणार आहे. या दाैर्‍यामध्ये टीम इंडिया आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात तीन वनडे आणि दाेन टी-२० सामन्यांची मालिका आयाेजित करण्यात आली आहे. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती साेमवारी संघाची घाेषणा करणार आहेे.

मात्र, अद्याप या दाैर्‍याला बीसीसीआयने अधिकृत असा दुजाेरा दिलेला नाही. प्रसारणाचा वाद आणि खेळाडूंच्या थकव्याचे कारण देत मंडळाने हा दाैरा रद्द करण्याचे संकेत दिले. अजिंक्य रहाणेला वगळण्यात अाल्याने नुकत्याच एका वेगळ्याच वादाच्या भाेवर्‍यात कर्णधार महेंद्रसिंग धाेनी सापडला आहे. त्यानेही या दाैर्‍यावर जाण्यास हाेकार दिला आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आता झिम्बाब्वेसाेबतचे सामने जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल, असेही या वेळी धाेनीने सांगितले.

मात्र, मागील आठवड्यांपासून प्रसारणाच्या मुद्द्यावरून जाेरदार वाद सुरू आहेत. त्यामुळे या दाैर्‍याला अद्याप काेणत्याही प्रकारचा दुजाेरा मिळालेला नाही.

विराट काेहलीला विश्रांती
सातत्याने खेळत असलेला विराट काेहली हा झिम्बाब्वे दाैर्‍यावर जाणार नसल्याची चर्चा आहे. याला त्याने दुजाेरा दिला आहे. यासाठीची विनंतीदेखील त्याने केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता यावर निवड समिती निर्णय घेणार आहे.
बातम्या आणखी आहेत...